Sun, Feb 5, 2023

महिलांचा उपक्रम "ओळख बांबूची"
महिलांचा उपक्रम "ओळख बांबूची"
Published on : 19 January 2023, 2:22 am
पिंपरी ः महिलांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय व प्राधिकरण विचार मंच निगडी यांच्या वतीने ‘ओळख बांबूची’ उपक्रम राबविला. यात पर्यावरण पूरक बांबूपासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले. यात होल्डर, राखी, कानातले, गळ्यातील हार, पणती स्टँड शिकवले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर , यशवंतराव लिमये, पालक महासंघाचे अध्यक्ष नितीन गावडे, बाळा दानवले, प्राधिकरण महिला विचार मंच अध्यक्ष स्वाती दानवले उपस्थित होते.