देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशातील बेरोजगारीला
केंद्र सरकार जबाबदार
कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका
देशातील बेरोजगारीला
केंद्र सरकार जबाबदार
कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका
देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : भारतातील केवळ १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती आहे. तळाच्या ५० टक्के गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त ३ टक्के संपत्ती आहे. हे ऑक्सफॅमच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन रोजगार व लघु उद्योग वाढीस मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. बेरोजगारीला कारणीभूत केंद्र सरकार असल्याची टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी नुकतीच केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने वार्षिक विषमता अहवाल सादर केला. त्यामध्ये भारतातील स्थितीबाबत एक स्वतंत्र पुरवणी मांडण्यात आली. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत १२१ टक्के प्रमाणे दररोज ३६०८ कोटी रुपयांची भर पडत आहे. गरीब-श्रीमंतीची दरी फार मोठी आहे. श्रीमंत श्रीमंतच होत आहेत.
हे भयानक वास्तव बदलण्याची गरज आहे. यावर्षीच्या प्रारंभीच २४ हजार नोकरदार बेरोजगार झाले. अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केलेले आहे. अदानी, अंबानी पूरक धोरणांमुळे बेरोजगारी, गरिबीची स्थिती यापुढेही आणखी खराब असू शकते. दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे स्वप्न हे खोटे ठरले. उलट बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याला मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरण जबाबदार असून, केंद्र सरकारने योग्य पावले न उचलल्यास तरुणांचा देश हा बेरोजगाराचा देश होण्यास वेळ लागणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.