
घरात अतिक्रमण करून महिलांना बेदम मारहाण
पिंपरी, ता. २० : बेकायदेशीररित्या घरात शिरून अतिक्रमण केले. मूळ घरमालक महिला घरात राहण्यासाठी आल्या असता, त्यांना घरात जाण्यास विरोध करून, त्यांना बेदम मारहाण करून गैरवर्तन केले. घरभाड्याचे सहा लाख रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे घडला.
पन्नास वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सहा वर्षांपूर्वी फिर्यादीने आरोपीला विश्वासाने घर भाड्याने दिले असता, फिर्यादीच्या घरात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले. दरम्यान, फिर्यादी यांची सासू, नणंद तेथे राहण्यासाठी गेल्या. त्यावेळी महिला आरोपीने त्यांना पन्नास हजार रुपये दिले तरच तुम्हाला घरात जाऊन देऊ, अशी धमकी देत घरात येण्यास विरोध केला. आरोपींनी फिर्यादीशी हुज्जत घातली. दोघांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ केली तसेच फिर्यादी व फिर्यादीची नणंद यांच्या पोटात लाथा मारल्या. पुरुष आरोपीने फिर्यादीशी गैरवर्तन करीत जोरात ढकलले. भाड्याचे सहा लाख रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केली. हा प्रकार बोऱ्हाडेवाडीतील लोटस नंदनवन, इ- विंग येथे घडला.
--------------------