Fri, Feb 3, 2023

हाउसिंग फेडरेशनची
महापालिकेला नोटीस
हाउसिंग फेडरेशनची महापालिकेला नोटीस
Published on : 20 January 2023, 2:49 am
पिंपरी, ता. २० ः मिळकतकर थकबाकीदार असलेल्या गृहनिर्माण सोसायटीचा पाणीपुरवठा महापालिका कर संकलन विभागाने खंडित केला होता. त्या विरोधात पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन आणि चिखली मोशी हाउसिंग फेडरेशन यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. करसंकलन विभागाला विनंती करूनही अधिकारी ऐकत नाहीत. ‘एखाद्याने कर भरला नाही म्हणून पूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशा नोटिस सोसायट्यांना दिल्या जात आहेत. दबाव आणून मानसिक त्रास देण्याचा हा प्रकार आहे. त्यामुले आम्ही कायदेशीर नोटीस दिली आहे. महापालिकेत जाऊन आंदोलन करू व न्यायालयात दाद मागू, असे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाइसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले.
--