शिरगावात पावणेपाच लाखांचे 
दारूच्या कच्चे रसायन नष्ट

शिरगावात पावणेपाच लाखांचे दारूच्या कच्चे रसायन नष्ट

सोमाटणे, ता. १३ ः शिरगाव येथे घातलेल्या छाप्यात पोलिसांनी चार लाख एक्याऐंशी हजार रुपयाचे दारुसाठीचे कच्चे रसायन नष्ट केले.
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीकाठी शिरगावात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्या आधारे शिरगाव पोलिसांनी पवना नदीकाठी असलेल्या गावठी दारूभट्टीवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी चार लाख ८१ हजार रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी वापरात असलेले रसायन नष्ट केले. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी
तेथून पलायन केले. ठाणे अंमलदार दिलीप राठोड यांनी केलेल्या तपासानुसार आरोपी नीलेश ज्ञानेश्वर पवार (वय ३५ रा. शिरगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात मोठा छापा असून, यातीलही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com