शांताबाईंच्या आठवणींचा
अभूतपूर्व ग्रंथ ‘बकुळगंध’

शांताबाईंच्या आठवणींचा अभूतपूर्व ग्रंथ ‘बकुळगंध’

पिंपरी, ता. १३ ः ‘‘अपरिमित श्रमाने सिद्ध झालेला ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. यानिमित्ताने शांताबाईंच्या कविता सर्वदूर पोहोचवून त्यांना खरोखरच न्याय देण्यात आला आहे,’’ असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे निर्मिती ‘बकुळगंध’ या शांता शेळके जन्मशताब्दी ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी पाटील बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गायिका अनुराधा मराठे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ उपस्थित होते. मराठे यांनी शेळके यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या शीघ्रकवित्वाचा दाखला म्हणून त्यांनी केवळ दहा मिनिटांत रचलेल्या मंगलाष्टकांचे सादरीकरण केले. तसेच रसिकांच्या आग्रहास्तव ‘ही वाट दूर जाते...’ या गीताचे सादरीकरण केले. साहित्य, संगीत, नाट्य, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रातील सुमारे १०० मान्यवरांनी बकुळगंध ग्रंथात रंजक आठवणी कथन केल्या आहेत. रिचा राजन आणि डॉ. गिरीश रांगणेकर यांनी शांता शेळके लिखित गीतांचे सुरेल सादरीकरण केले. संजय जगताप व श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com