सांगवी फाटा येथील खड्डा बुजविण्याची मागणी

सांगवी फाटा येथील खड्डा बुजविण्याची मागणी

पिंपरी ः पुणे जिल्हा रुग्णालयाच्या बाजूने सांगवी फाटा येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु ठेकेदाराने तेथील खड्डा मुरूम टाकून बुजविला पाहिजे होता. तसे न करता ठेकेदाराने खड्डा तसाच ठेवला आहे. रस्ता हा जुना पुणे-मुंबई म्हणून ओळखला जातो. येथे सकाळ-सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी तातडीने याठिकाणी उपाययोजना करावी.
- प्रदीप गायकवाड, सांगवी फाटा

पदपथावरच गाडीचा सांगाडा
चिंचवड बिर्ला हॉस्पिटलकडून चिंचवडेनगरकडे जातांना महापालिकेने केलेल्या पदपथावरच कोणीतरी गाडीचा सांगाडा आणून ठेवला आहे. सामान्य नागरिकांनी चालायचे कोठून? पालिकेने त्वरित योग्य ती कारवाई व अंमलबजावणी करण्याची मागणी स्‍थानिकांची आहे.
- रमेश पाटील, दत्तनगर, थेरगाव

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रगीत म्हणण्यास चालू करा
महापालिकेचे चिंचवडमध्ये ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयात राष्ट्रगीत होत नाही ही बाब महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजप शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या निदर्शनास आली. पालिका कार्यालयात राष्ट्रगीत रोज घ्यावे, हे प्रशासनास आम्ही नागरिकांनी सुचवावे, हे दुर्दैवी आहे. बच्चे यांनी ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांना पत्र देऊन वरील विषय निदर्शनास आणून दिला व त्वरित ‘ब’ प्रभागात राष्ट्रगीत म्हणण्यास चालू करावे, असे बच्चे यांनी पंडित यांना पत्र दिले. ते पत्र पंडित यांच्या स्वीय सहायक रंजना घाडगे यांच्याकडे सुपूर्त केले.
- मधुकर बच्चे, चिंचवड

विद्यानंद भवन शाळेतर्फे ‘स्वच्छता सप्ताह’
निगडी येथील विद्यानंद भवन शाळेत स्वच्छता मोहिमेअंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण-पाटील व विश्वस्त श्वेता चव्हाण-पाटील यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा मिसाळ यांनी स्वच्छता अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता फेरी, पथनाट्ये अशा विविध उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता संदेश देणारी स्वच्छताफेरी काढून जनजागृती केली. शाळेच्या पर्यवेक्षिका अर्चना बानवली, क्रीडा शिक्षिका सरोजा सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन व इतर सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे नेतृत्व केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com