मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ : प्रशासकीय राजवटीत नागरिकांना नागरी सुविधांपासून अनेक महिने वंचित ठेवल्याने शहरातील त्रस्त करदात्या नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर उपोषण केले. या वेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी लेखी आश्वासन देत सर्व समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे सांगितल्यानंतर स्वातंत्र्यसैनिक जांभूळकर यांनी पाणी घेत उपोषण मागे घेतले.

तळेगाव शहरांमध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नाही, यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सांडपाणी वाहिनी व इतर कामांसाठी रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर पावसाळा संपूनही अद्याप रस्ते खड्डे मुक्त नाही, गटारे व रस्ता लगत वाढलेल्या गवतावर डासांचा प्रादुर्भाव असून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरात नियमित स्वच्छता व्हावी आदी मागण्यांसाठी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या व लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
या वेळी शहर भाजपचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी अध्यक्ष रवींद्र माने, माजी नगरसेवक दिलीप खळदे, नवनाथ कुल, आनंद घोडके, किरण साळवे, शोभा परदेशी, विशाल पवार, महेश कदम, बाळासाहेब शेडगे, सुनील दाभाडे, गोपाळ परदेशी, सचिन भांडवलकर, निरंजन जहागीरदार, प्रेमनाथ परदेशी, दिलीप चौधरी, आनंद घोडके, मयूर गरुड, उल्हास आगळे आदींनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.