फटाका स्टॉल हवाय का?
 एक हजार रुपये भरा !

फटाका स्टॉल हवाय का? एक हजार रुपये भरा !

Published on

पिंपरी, ता. ३ ः दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. फटाका विक्रीसाठीदेखील तयारी सुरू झाली आहे. शहरात दरवर्षी अनेक स्टॉल परवानगी न घेताच उभारले जातात. परंतु यावर्षी महापालिकेने कडक धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार एक हजार रुपये परवानगी शुल्क आकारण्यात येणार आहे. मंगळवारअखेर शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. परिणामी, फुकटे फटाका स्टॉलधारकांना वचक बसणार आहे.
स्टॉलसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून शुल्क आकारून परवानगी देण्यात येत आहे. तसेच मोकळ्या जागेवर परवानगी दिली जात नसल्याने अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. बेकायदा स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे.

स्टॉल उभारताना अशी घ्या काळजी
१) आगीच्या घटना टाळण्यासाठी स्टॉलशेजारी वाळू ठेवावी.
२) फटाका स्टॉल परिसरात, बिडी, सिगारेट पेटवू नये.
३) परिसरात ज्वलनशील पदार्थ ठेवू नये.
४) फटाका स्टॉलपासून लहान मुलांना दूर ठेवावे.
५) १ ते ५ हजार लिटर पाण्याची व्यवस्था ठेवावी.

बेकायदेशीर स्टॉलवर कारवाई
महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आठही क्षेत्रीय कार्यालयाकडून फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात येत आहे. मंगळवारअखेर शहर परिसरातून फटाका स्टॉल उभारण्यासाठी ६० जणांनी अर्ज केले होते. त्यांना अग्निशामक विभागाने परवानगी दिली आहे. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात बेकायदेशीर फटाका स्टॉल उभारल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी बेकायदेशीररीत्या स्टॉल उभारून फटाके विक्री केल्याचे दिसून येते. आगीसारख्या भीषण घटना घडू नये, याकरिता प्रशासन यंदा सतर्क असून, बेकायदेशीर स्टॉलधारकांवर कारवाई करणार आहे.

कोट
‘‘अग्निशामक विभागाने एक हजार रुपये परवानगी शुल्क आकारून ६० फटाका स्टॉलधारकांना परवानगी दिली आहे. व्यावसायिकांनी फटका स्टॉल उभारण्यापूर्वी महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे.’’
-अनिल डिंबळे, प्रभारी अधिकारी अग्निशामक दल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.