गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

दिघीत मंगळसूत्र लुबाडले
पिंपरी : पायी जाणाऱ्या महिलेला जवळ बोलावून भविष्याबद्दल सांगतो म्हणून महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लुबाडल्याची घटना गुरुवारी (ता.२) सकाळी साडेदहा वाजता दिघी येथे घडली.
या प्रकरणी महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दिघी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळून पायी घरी जात होत्या. यावेळी आरोपींनी त्यांना खूणवून जवळ बोलावून घेतले. त्यांना आपल्याला देवाचे व भविष्याचे सांगता येते, असे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीवर देव प्रसन्न होणार आहे, असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र घेतले. त्यावर मंत्र फुंकण्याचा बहाणा करून मंगळसूत्र पिशवीत ठेवले आहे, असे सांगत महिलेला लुबाडले. आपली फसवणूक झाली आहे समजताच फिर्यादीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अवैध गॅस विक्री; तरुणावर गुन्हा
पिंपरी : भरलेल्या गॅस टाक्यांमधून रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या तरुणावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता.२) सकाळी भोसरीतील शांतीनगर झोपडपट्टी येथे उघडकीस आली.
भरत सूर्याजी मोरे (वय २३, रा.भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षिततेची काळजी न घेता शांतीनगर या झोपडपट्टीत भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. यावेळी जीवास धोका होईल, हे माहिती असताना देखील असे कृत्य केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.