पिंपरी आजपासून विचार प्रबोधन पर्व

पिंपरी आजपासून विचार प्रबोधन पर्व

पिंपरी, ता. १० ः क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे मंगळवारपासून (ता. ११) विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील मैदानात (पिंपरी चौक) कार्यक्रम होतील. शनिवारी (ता. १५) समारोप होणार आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. विचार प्रबोधन पर्वाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहा वाजता होईल. सकाळी साडेदहा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर पिंपरी चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल.

मंगळवार (ता. ११)
सकाळी १० ः शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा ‘नवयान महाजलसा’ प्रबोधनात्मक कार्यक्रम. ११.३० ः कुमार आहेर यांचा ‘मी ज्योतिराव फुले बोलतोय’ एकपात्री नाट्यप्रयोग. दुपारी १२.३० ः महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. २ ः गायक राहुल शिंदे व विजय सरतापे यांचे गीतगायन. ३.३० ः राहुल कांबळे यांचा महामानवांच्या गीतांचा कार्यक्रम. सायंकाळी ५ ः ‘महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था व चित्रपट माध्यमांची भूमिका’ विषयावर परिसंवाद. सहभाग ः दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल. ७ ः डॉ. किशोर वाघ यांचे ‘वामनाचा जत्था’ प्रबोधनात्मक कार्यक्रम. रात्री ८.३० ः मैना कोकाटे यांचे गीतगायन

बुधवार (ता. १२)
सकाळी १० ः स्थानिक कलावंतांचे गीतगायन. ११.३० ः नागेश गवळी यांचे ‘शिव-फुले-शाहू आंबेडकरांचा क्रांतिकारी लढा’ विषयावर व्याख्यान. दुपारी १२.३० ः ज्येष्ठ गायक विष्णू शिंदे यांचे गीतगायन. २ ः गायक सुयोग केदार व आश्विन निरभवणे यांचे गीतगायन. ४ ः ‘रुपयाची समस्या - एक असंबोधित आर्थिक प्रश्‍न’ विषयावर चर्चासत्र. सहभाग ः साहित्यिक डॉ. वामन गवई, जर्मनीतील भारतीय राजदूत सुयश चव्हाण, जेएनयू दिल्ली येथील डॉ. मिलिंद एकनाथ आव्हाड, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. लक्ष्मण यादव. सायंकाळी ६ ः डॉ. अविनाश नाईक व सहकाऱ्यांचा ‘यशोगाथा महासूर्याची’ कार्यक्रम. रात्री ८ ः गायक राहुल अन्वीकर यांचे गीतगायन.

गुरुवार (ता. १३)
सकाळी १० ः स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम. ११:३० ः गायक संकल्प गोळे व मुन्ना भालेराव यांचे गीतगायन. दुपारी १ ः गायक चेतन लोखंडे, मंजूषा शिंदे, शेखर गायकवाड, स्वप्नील पवार याचा ‘जल्लोष भीमरायाचा’ संगीतमय कार्यक्रम. ३ ः माजीद देवंबदी (दिल्ली), वारीस वारसी (मेरठ), शरफ नैनपारवी (उत्तरप्रदेश), मोईन शादाब (नवी दिल्ली), अनंत राऊत, नारायण पुरी (महाराष्ट्र) आणि कालेनंद यांचा ‘काव्यशायराना’ कविता व शायरीचा कार्यक्रम. सायंकाळी ५ ः गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा गझलांचा कार्यक्रम. ६.३० ः सार्थक शिंदे, दर्शन जावळे, क्रांती शिंदे, उन्नती रायते, चेतना इंगळे, सृजना भगवान सरवदे यांचा ‘हम भीमके दिवाने’ कलाविष्कार. ७ ः बाळू साळवे यांचे माऊथ ऑर्गन वादन. रात्री ८ ः आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम.

शुक्रवार (ता. १४)
सकाळी ६ ः नागसेनदादा सावदेकर, कुणाल वराळे, प्रांजल बोधक आणि लक्ष्मी लहाने यांच्या उपस्थितीत धम्मपहाट. ८ ः शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा. सकाळी ९ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. ९.१५ ः काजल कोथळीकार यांचे ‘ऐका मी रमाई बोलते’ एकपात्री प्रयोग. १० ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना. १०.३० ः एकता कर्मचारी संघटनेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. १०.४० ः पुरस्कार व गौरव सोहळा. १०.५० ः आदिवासी कालानृत्यातून अभिवादन. दुपारी
१२.३० ः गायिका रागिणी-रोहिणी बोदडे यांचे गीतगायन. २ ः बालप्रबोधनकार सप्तखंजिरीवादक तुलसी हिरवे यांचे कीर्तन. ३.३० ः पंडित मिलिंद रायकर यांचे ‘कलर्स ऑफ व्हायोलिन आणि प्रसाद सोनवणे व चित्रकार सुमेध कल्हाळीकर यांच्या कलेतून अभिवादन. सायंकाळी ५ ः विपिन तातड, स्वप्नील गणवीर, श्रावस्ती मोहिते, मंगेश इंगोले व स्वरूप डांगळे यांचे रॅपसॉंग. ७ ः अनिरुद्ध वनकर यांचे ‘वादळवारा’ गीतगायन. रात्री ९ ः साजन बेंद्रे, विशाल चव्हाण आणि अभिषेक राजे यांचा ‘महासंगीताचा कलाविष्कार’.

शनिवार (ता. १५)
सकाळी १० ः गायक विशाल ओव्हाळ आणि धिरज वानखेडे यांचे गायन. दुपारी १२ ः गायक धम्मानंद शिरसाठ व प्रज्ञा इंगळे यांचे गीतगायन. २ ः कशाला मागं सरायचं, हे दोन अंकी नाटक. एचए मैदान पिंपरी येथे दुपारी ४ ः डॉ. गणेश चंदनशिवे आणि चेतन चोपडे यांचे ‘तुझ्या पाऊल खुणा..’ आंबेडकरी जलसा. सायंकाळी ६ ः जतिन पाटील दिग्दर्शित ‘क्रांतिसूर्य’ महानाट्य.

उद्योजकता प्रशिक्षण शिबिर
पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे महापालिका आणि बानाई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स) यांच्यातर्फे १७ ते १९ एप्रिल २०२३ दरम्यान बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. २१ एप्रिल रोजी रोजगार मेळावा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com