पिंपरीत भीमसृष्टीचे पालटले रूप

पिंपरीत भीमसृष्टीचे पालटले रूप

पिंपरी, ता. १० : ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा विचार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती शुक्रवारी (ता. १४) साजरी होत आहे. यानिमित्त महापालिकेतर्फे पिंपरीतील भीमसृष्टीचे रूप पूर्णपणे पालटले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळ ‘थॅंक यू डॉ. बी. आर. आंबेडकर’ यांचे धन्यवाद व्यक्त करणारा व त्यांच्या सहीचा बोर्ड लावण्यात आला आहे. हे दोन्ही बोर्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या बोर्डबरोबर सेल्फी घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. तसेच रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या रोषणाईमध्ये भीमसृष्टीचे अनोखे रूप सगळ्यांच्या नजरेत भरणार आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय्यत तयारी सुरू असून, शुक्रवारी शहरात दिवसभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीसाठी बाजारात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले टी शर्ट, झेंडे, मफलर आदी बाजारात दाखल झाले असून, खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. काही ठिकाणी अन्नदान आणि रक्तदान शिबिराचे नियोजन केले आहे.

‘थॅंक यू डॉ. बी. आर. आंबेडकर’ बोर्डने सौंदर्यात भर
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ महापालिकेच्या महोत्सव नियोजन समितीने नागरिकांच्या मागणीनुसार आठ सेंमी उंचीचा आणि चार मीटर लांबीचा ‘थॅंक यू डॉ. बी. आर. आंबेडकर’ आणि ३.५० मीटर लांबीचा व आठ सेंमी उंचीचा बाबासाहेबांच्या सहीचा बोर्ड लावण्यात आल्याने चौकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. रात्रीच्या वेळी निळा रंग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिकेचे जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांनी शिफारस केली होती. त्यावर आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेनुसार बोर्ड लावण्यात आल्याची माहिती कनिष्ठ अभियंता शशिकांत मोरे यांनी दिली.

शुभेच्छा फलकांची झालर
पिंपरी चौक, काळेवाडी, पिंपरीनगर, पिंपरी उड्डाणपूल, खराळवाडी, चिंचवड स्टेशन, मोरवाडी, मोहननगर, वल्लभनगर, संत तुकाराम नगर, कासारवाडी आदी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. जागोजागी तरुण मंडळे आणि भीमसैनिकांचे अन्नदान करणारे फलक लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहर रोषणाईसह निळ्या पताकांनी सजविले जाणार असून, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदनासह वैचारिक प्रबोधन करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

23T35961

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com