पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर पॅनलचे वर्चस्व

पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर पॅनलचे वर्चस्व

पिंपरी, ता. १० : पवना सहकारी बँकेवर अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे. पॅनेलचे सर्वांच्या सर्व १७ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर, दोन उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून बँक त्यांच्या ताब्यात दिली. विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान, विरोधातील पवना प्रगती पॅनेलच्या सातही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. सर्वसाधरण गटातील १४ पुरुष, सर्वधारण गटातील दोन महिला आणि अनुसूचित जाती-जमातीतील गटातील एक अशा १७ जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (ता. १०) मतमोजणी पार पडली. पॅनेलमधील इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी विजयी उमेदवार घोषित केले. अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या प्रचाराची धुरा माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी यशस्वीपणे सांभाळली.

सर्वांना सोबत घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी यापुढेही एकोप्याने काम केले जाईल. निवडणूक संपली आता राजकारण संपले. सर्वजण एकत्रित बँकेच्या हितासाठी काम करतील. बँकेचे कार्यक्षेत्र आणि कार्यकक्षा विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील. पवना बँकेला शेड्यूल बँके’चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- ज्ञानेश्वर लांडगे, पॅनेल प्रमुख, अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल


मगर पॅनेलमधील उमेदवार आणि मिळालेली मते
सर्वसाधारण गट - ज्ञानेश्वर लांडगे ३१५५, विठ्ठल काळभोर ३१०८, शांताराम गराडे २८८५, जयनाथ काटे ३०२४, अमित गावडे ३०९३, श्यामराव फुगे २९९४, शिवाजी वाघेरे ३०४८, शरद काळभोर ३०७७, जितेंद्र लांडगे २९८५, सचिन चिंचवडे ३०३१, सचिन काळभोर ३०५३, चेतन गावडे ३०५०, सुनील गव्हाणे ३०४९, बिपिन नाणेकर ३०१३. महिला राखीव गट ः जयश्री गावडे २९५७, ऊर्मिला काळभोर ३०११. अनुसूचित जाती-जमाती गट ः दादू डोळस ३०७४.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com