२०२६ पर्यंत ५० टक्के ई-रिक्षांचे उद्दिष्ट

२०२६ पर्यंत ५० टक्के ई-रिक्षांचे उद्दिष्ट

२०२६ पर्यंत ५० टक्के ई-रिक्षांचे उद्दिष्ट

महापालिका प्रशासक सिंह यांची माहिती; विविध संघटना व संस्थांची बैठक

पिंपरी, ता. १० ः सध्या शहरातील ऑटो रिक्षा पेट्रोल व सीएनजीवर धावत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी ई-रिक्षांची संख्या वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. २०२६ पर्यंत शहरात किमान ५० टक्के ई-रिक्षांचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पर्यावरण पूरक वाहनांसाठी पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) सेल स्थापन केला आहे. त्याअंतर्गत तीनचाकी ई-वाहनांच्या वापरला गती देण्याच्या उद्देशाने उद्योग व वाहन संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत सोमवारी बैठक झाली. त्यात सिटी ईव्ही सेलने सीएनजीवरील रिक्षांच्या तुलनेत ई-रिक्षा चालविण्याचे फायदे आणि रिक्षाचालक, मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचे विविध प्रकार, तंत्रज्ञान व अर्थकारणाची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी महापालिकेच्या पर्यावरण, विद्युत, बांधकाम परवानगी विभागांच्‍या धोरणांची माहिती दिली. तीनचाकी वाहन श्रेणीतील विद्यमान मूळ उपकरणे उत्पादक, चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादार, बँका आणि वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, प्रमुख रिक्षासंघटना पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते. माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी शहरातील महिला ऑटो रिक्षाचालकांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे
- सीएनजीच्या तुलनेत ई-रिक्षा तांत्रिक व आर्थिक परिणामांबद्दल ऑटो युनियनला जागरूक करणे
- रिक्षाचालकांना ई-रिक्षांच्या खरेदीचा व त्या चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती देणे
- ई-रिक्षा खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलती
- ई-रिक्षाची आर्थिक व्यवहार्यता व चार्जिंग सुविधांचा विकास
- ई-रिक्षा घेण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्याची माहिती

शहरातील ई-रिक्षांची सद्यःस्थिती
- शहरात ई-वाहनांची संख्या ११ टक्के
- ई-वाहनांमुळे १२,७५० टन कार्बन उत्सर्जन टळेल
- आतापर्यंत १० हजारावर ई-वाहने
- ई-वाहनांसाठी शंभर कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक
- सहाशेपेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन प्रस्तावित

दृष्टिक्षेपात सीएनजी व ई-रिक्षा
- ई-रिक्षाचा प्रतिकिलोमीटर खर्च २ ते ३.५० रुपये
- सीएनजी रिक्षाचा प्रतिकिलोमीटर खर्च ५.२५ ते ५.५० रुपये
- ई-रिक्षाची किंमत दोन लाख पाच हजार ते दोन लाख ९० हजार
- सीएनजी रिक्षाची किंमती अडील लाख रुपये
- ई-रिक्षा ८० किलोमीटरसाठी २५० रुपये खर्च
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com