शहरात ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा

शहरात ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा

पिंपरी, ता. २२ ः जकात, फितरा, खैरात करून पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने रमजान ईद उत्साहात साजरा केली. नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून मिरवणारे चिमुकले अन् शिरखुर्म्याबरोबरच बिर्याणीचा आस्वाद अशा वातावरणात एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. मुस्लिम महिलांनी घरातच नमाज पठण केले. सकाळपासूनच नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून आबालवृद्धांची पावले जवळच्या मस्जिद व मदरसाकडे वळाली होती. या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुराण पठण, जकातुल फित्र आदी धार्मिक विधी करून दुवा मागितली.

मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले. या निमित्त शहरातील विविध मशि‍दींबरोबर चिंचवडच्या ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम नागरिकांनी सामुदायिक नमाज अदा केली. शहरातील मशिदींना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच, अनेक घरांमध्येदेखील विद्युत रोषणाई केली होती. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, काळेवाडी आदी परिसरात मशीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना धर्मगुरूंनी नमाज पढविला. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम बांधवांची व्यवस्था
शहरात विविध ठिकाणच्या मशीद, मदरसे, ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांची व्यवस्था विविध ठिकाणी तेथील ट्रस्टीच्या वतीने करण्यात आली. त्यात निगडी येथील नुराणी मशिदमध्ये अध्यक्ष रशीद शेख, जुहूर खान, लियाकत शेख, मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले. आकुर्डीत मदिना मशीद, अक्सा मशीद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातिमा मशीद, नुरूल इस्लाम मशीद, कस्तुरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मशिदमध्ये नमाज पढविण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील दवा बाजार येथील समा-ए-दिन-ए अदब मशिदमध्ये नमाज पठण झाले. काळाखडक वाकड येथे गौसीया जामीया मशिदमध्ये अध्यक्ष समीर खान, युसूफ खान, जमीयतूल कुरेशी, पिंपरी मशिदीमध्ये अध्यक्ष युसूफ कुरेशी, शेहबाज कुरेशी. सुबानीया जामा मशीद, काळेवाडी येथे जुम्मादीन मुलाणी, शौकत मुलाणी, इस्माईल शेख. गुलशन ए मदिना मशिदीमध्ये अध्यक्ष शौकत मुल्ला, एजाज पटेल. जमातीया लतिफीया जामा मशिदमध्ये अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, हाजीअकबर मुल्ला, फकीर मुलाणी, मुस्ताक शेख. नेहरूनगर येथील तवक्लल्ला जामा मशिदीचे अध्यक्ष नजीर तरजगार, हाजी रशीद पिरजादे, आयातुल्ला सय्यद. दापोडी गावठाण येथे जामा मशिदीचे अध्यक्ष कुरशीद सय्यद, आरिफ शेख, फिरोज शेख. भोसरी गावठाणामध्ये अंजुमन शैफूल इस्लाम जामा मशिदीचे अध्यक्ष करीम सय्यद, सरदार शेख, अब्दुल अहमद, राजू मुलाणी. लांडेवाडी येथे मदरसा असरफीया मदरसाचे अध्यक्ष तौफीक खान, हाजी गयासुद्दीन खान, हाजी अब्रारअली. कुदळवाडी येथे रजा जामा मशिदीचे अध्यक्ष नियाज सिद्दीकी. नुराणी मशिदीमध्ये अध्यक्ष नजीउल्ला खान, सोहराब शहा, हाजी जउल्ला सिद्दिकी. मदिना जामा मशिदमध्ये अध्यक्ष जुम्मन खान, मकबूल खान. अशरफीया मशिदमध्ये अध्यक्ष याकूब खान, नियाज सिद्दीकी. पवारवस्ती चिखली येथे नूरी मशिदीमध्ये जमीर उल्ला चौधरी, शाही मशिदमध्ये अध्यक्ष फिरोज शेख, ईसाक शेख. चऱ्होली गावठाण येथे अहेले सुन्नत वल जमात मुलाणी मशिदीमध्ये अध्यक्ष सिराज हाजी गुलाम मुलाणी, वसीम मुलाणी, अकबर मुलाणी. कासारवाडी येथील अंजुमन गुलशने मदिना मशिदीचे अध्यक्ष लियाकत कुरेशी अकबर शेख, दस्तगीर तांबोळी उपस्थित होते.

चिंचवडगाव ईदगाह मैदानावर नमाज पठण
चिंचवडगाव येथील इदगाह मैदानावर व अलमगीर शाहीद येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘आपण स्वतः, कुटुंब व समाज सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष ठेवा. पोलिस सदैव आपल्या बरोबर आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. अध्यक्ष गाजीम बसरी, इम्रान पानसरे, इक्बाल मुलाणी आदींनी संयोजन केले. माजी महापौर आझम पानसरे यांना अनेक मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. विविध भागात स्थानिक राजकीय सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन ईद निमित्त पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

दररोज पाच वेळा नमाज पठण करण्याचे आवाहन
या रमजान महिन्यामध्ये शुक्रवारची व रमजान सणाच्या वेळेला जशी नमाज पठण करता, तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावे. ज्या चुका केलेल्या आहेत. त्याची क्षमा अल्लाहजवळ मागा, सत्याची कास अंगीकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडिलांनी करावे, असे आवाहन करून रमजान सणाची माहिती विशद केली. चिंचवड स्टेशन येथे गौसीया जामा मशिदमध्ये अध्यक्ष झिशान सय्यद, युसूफ खान, समीर शेख, हबीब शेख आदींनी संयोजन केले. आकुर्डी येथील अक्सा मशिदमध्ये अध्यक्ष शाकीर शेख, शकिल खान, एजाज शेख यांनी संयोजन केले. मदिना मशिदमध्ये तसेच, सुन्नी मशिदमध्ये अध्यक्ष अमजद शेख यांनी नमाज पठण केले.

गरीब कुटुंबांना दान
रमजान महिन्यात सधन कुटुंबाकडून गरीब कुटुंबांना धान्य दिले जाते. त्याला ‘फितरा’ असे म्हटले जाते. ईदची नमाज पठणापूर्वी श्रीमंत, सधन आणि चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे अडीच किलो धान्य किंवा तेवढी रक्कम आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या गरीब कुटुंबांना दान म्हणून देण्यात आले. जेणेकरून गरिबांतील गरिबालासुद्धा ईद साजरी करता यावी.

पूर्वजांच्या कबरपुढे वाहिली फुले
शहरातील विविध भागात असलेल्या कब्रस्तानच्या ठिकाणी रमजान ईदच्या नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. ‘शबे कद्रची रात्र’ त्यानिमित्ताने नातेवाइकांनी पूर्वजांचे स्मरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com