कामगारांची उन्नतीसाठी कल्याण मंडळ

कामगारांची उन्नतीसाठी कल्याण मंडळ

कामगारांची उन्नतीसाठी कल्याण मंडळ
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागांतर्गत कार्यरत आहे. शिस्त, सेवा, सुधार, समृद्धी हे मंडळाचे ब्रीद आहे. समाजातील विविध घटकातील नोंदणीकृत कामगारांना दर्जेदार कल्याणकारी योजना, कार्यक्रम व सुविधा पुरवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे आणि मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व मानसिक उन्नती घडविणे, हा मंडळाचा हेतू आहे.
- समाधान भोसले, सहायक कल्याण आयुक्त

---------------
का मगारांचे सर्वंकष समाधान करणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व पद्धतशीर आयोजन करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगार कल्याण मंडळ कार्यरत आहे. कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणारे विविध आस्थापनेतील कर्मचारी, ज्यांचा दरवर्षी जून व डिसेंबरच्या वेतनातून, कामगार कल्याण निधी कपात होतो. त्या सर्वांकरिता या मंडळाद्वारे विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात.

शिष्यवृत्ती योजना
सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना : दहावी ते पदवी व पदव्युत्तर, तांत्रिक अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना देण्यात येते. (६० टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक) यामध्ये १० वी ते १२ वी २००० रुपये, पदवीसाठी २५०० रुपये, पदवीव्यूत्तर पदवीसाठी ३००० रुपये, दहावीनंतर डिप्लोमा २५०० रुपये, बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, तांत्रिक पदवीसाठी ५००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

क्रीडा शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना पंधरा हजार, सात हजार, पाच हजार व तीन हजार रुपये (राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार किंवा कामगार कुटुंबीय सदस्याने क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी)

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अन्य योजना
- परदेशातील पदवीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी पन्नास हजार रुपये, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजनेतून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण पाच हजार, यूपीएससी उत्तीर्ण आठ हजार, पीएच डीसाठी पाच हजार रुपये.
- दिव्यांग कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेत टक्केवारीची अट नाही. पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेतून अकरावी ते पदवीत्तोरपर्यंत पाठ्यपुस्तकांसाठी ५० टक्के आर्थिक सहाय्यता, दिव्यांगांना या योजनेचे १०० टक्के अनुदान देण्यात येते.
- एमएससीआयटी अनुदान योजनेसाठी किमान ६० टवके गुणाने उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांना कोर्स फी च्या ५० टक्के रक्कम अनुदान मिळेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून एक वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अपंगांना या योजनेचे शंभर टक्के अनुदान देण्यात येते.
- गंभीर आजार उपचार सहाय्यता योजनेत स्वतः कामगार किंवा कुटुंबीय (आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले) यांना मूत्रपिंड, कर्करोग, ह्रदयरोग, एचआयव्ही, किडनी, क्षयरोग, कॅन्सर, सिकलसेल, अर्धांगवार्य, मेंदूरोग आदी मोठ्या आजार व शस्त्रक्रियेसाठी औषधोपचाराकरिता आर्थिक मदत मिळते. एक लाखापर्यंत खर्च झाल्यास पाच ते २० हजार रुपये आणि एक लाखापेक्षा जास्त खर्च झाल्यास २५ हजार रुपये सहाय्यता मिळते.
- माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये विशेष शिष्यवृत्ती दिली जाते.
- कामगार लेखन साहित्य प्रकाशन अनुदान योजनेतून कामगार लेखकांना स्वरचित कथा, कादंबरी, कविता आदी सारखे साहित्य प्रकाशनासाठी प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य १० हजार रुपये दिले जाते.
- कामगार व कुटुंबीय महिलांना शिवणयंत्र अनुदान योजना मंडळाच्या शिवणवर्गात प्रवेश घेतलेल्या व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कामगार व कामगार कुटुंबीय महिलांना केवळ १० टक्के रकमेत शिवणयंत्र मिळते. ९० टक्के रक्कम देण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com