कोयता गँगचा उच्छाद सुरूच 
शहरवासीय भयग्रस्त ः धारदार कोयते मिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न

कोयता गँगचा उच्छाद सुरूच शहरवासीय भयग्रस्त ः धारदार कोयते मिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पिंपरी, ता. २९ : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. धारदार कोयते मिरवत दहशत माजवण्याच्या घटना वाढत आहे. पिंपरीतील घटनेने कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.

कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटणे, दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड, प्राणघातक हल्ला यासह खुनाच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात कोयत्याचा वापर केला जात आहे. सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन आरोपींकडेही कोयते आढळत आहेत. कोयता गॅंगचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------
शहरवासीयांमध्ये दहशत
काही दिवसांपूर्वी पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवल्याचे प्रकार समोर आले होते. विधिमंडळताही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. अशा गुंडांवर कडक कारवाईची मागणी लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली. यामुळे पोलिसांनी कडक पावले उचलत मोठ्याप्रमाणात कारवाई केली. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्येही कोयता गॅंग वारंवार डोके वर काढल्याचे दिसत आहे. शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
------------------
व्हिडिओत घटनेची गांभीर्यता

पिंपरीतील घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामधील दृश्य पाहून अंगावर काटा येतो. कमरेला कोयता लावून आलेले आरोपी दुकानात शिरतात. त्यानंतर धारदार कोयते काढून दुकानदारावर हल्ला चढविल्याचे दिसत आहे. यासह दहशत माजवत आरडाओरडा करून दुकानाचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अशाप्रकारे गुन्हेगारांचे वाढणारे धाडस वेळीच मोडून काढणे गरजेचे आहे.
--------------------

गुन्हेगारांवर मोका, तडीपार यासह प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच आहे. कोयता बाळगणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अल्पवयीन गुन्हेगारांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

- डॉ. संजय शिंदे, सहपोलिस आयुक्त, पिंरी-चिंचवड.
--------------


* एप्रिल महिन्यातील काही घटना

१ एप्रिल
चिंचवड अजंठानगर येथे दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

१ एप्रिल
बावधन येथे तिघांनी तरुणाकडे रोकड लुटून कोयत्याने वार केले.

१ एप्रिल
चिखली येथे हत्याराने वार करून तरुणीचा खून
४ एप्रिल
थेरगाव येथे आरोपीने कोयत्याने वाहनांची तोडफोड केलं.

११ एप्रिल

सुस येथे टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

११ एप्रिल
मोशीतील तापकीरनगर येथे जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला.

१३ एप्रिल

रागात बघितल्याच्या कारणावरून टोळक्याकडून तरुणावर
कोयत्याने वार

१६ एप्रिल

भोसरी येथे अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हलला.
२५ एप्रिल

पिंपरी मार्केट येथे तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला.

२५ एप्रिल

पिंपळे निलख येथे एकावर कोयत्याने वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com