Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSakal

Pimpri Chinchwad : बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलेला वाकडमध्ये अटकेत

त्यानुसार चार महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता पिंपरी-चिंचवड परिसरातील बसमध्ये चोरीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.

पिंपरी - बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलांना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. या महिलांकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सोनिया अजय कांबळे (वय ३१), मीना मिलिंद उपाध्ये (वय ३०), सुमन प्रताप काळे (वय २९), लक्ष्मी बिलिमोर उपाध्ये (वय २१, सर्व रा. राजीव गांधीनगर, झोपडपट्टी, विश्रांतवाडी, पुणे) अशी महिलांची नावे आहेत.

Pimpri Chinchwad
Mumbai Crime : महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना काल अटक

काही संशयित महिला डांगे चौकातील बस थांब्याजवळ फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार चार महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता पिंपरी-चिंचवड परिसरातील बसमध्ये चोरीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने व रोकड असा चार लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत वाकड ठाण्यातील चार तर चिंचवड ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com