सत्कार, मनोगत आणि पाद्यपूजा...

सत्कार, मनोगत आणि पाद्यपूजा...

Published on

पिंपरी, ता. ३ ः गुरू आहे सावली, गुरू आहे आधार, गुरू आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरू आहे अंबरात, गुरू आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरू आहे चराचरांत.’’ या श्‍लोकाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त शाळा-महाविद्यालय, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, गुरुकुलात आणि वसतीगृहात गुरूंचे पूजन करण्यात आले. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या माता-पिता आणि गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मापुसकरांचे गुरुकुल ः
डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित देहूगाव येथील सुनीती विद्यालय, मापुसकरांचे गुरुकुल येथील शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत आमंत्रित करण्यात आले. त्यांचे वंदन व पूजा करून अनोख्या पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते जलपात्र घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या मातांच्या चरणांना स्नान देऊन, चंदनपुष्प अर्पण करून त्यांची पूजा केली व मनोभावे वंदन केले, अशी माहिती प्राचार्या सोनाली उल्हास मापुस्कर यांनी सांगितले.

अभिषेक विद्यालय ः
शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण तसेच मातृपूजन यामधे मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी द्रोणाचार्य आणि एकलव्य गुरू-शिष्यावर आधारित नाटिका सादर केली. तसेच भेट कार्डाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका गीता चरंतीमठ, शाळेचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

एस.पी.एम विद्यालय ः
यमुनानगर निगडी एस.पी. एम. शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त पालकांसाठी पाद्यपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका लीना वर्तक, उपशिक्षिका कांचन नारखेडे, अश्विनी चौधरी, जयश्री कुलकर्णी, वृषाली बोईड यांनी संयोजन केले. तर साक्षी निंबर्गी आणि समर्थ गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा आयुष्यातील गुरूचे महत्त्व पटवून देण्यात आले.

पी. के. इंटरनॅशनल स्कूल ः
पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे व प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या हस्ते दत्तांच्या व महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरू व शिष्य यांचे नाते काय असते हे पटवून देण्यासाठी एक सुंदर कथा सांगितली. प्राचार्या धनश्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गुरूचे असलेले महत्त्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूबद्दलचे प्रेम व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन वंदन केले. सूत्रसंचालन श्रद्धा सिंग यांनी केले. तर शुभांगी कडुसकर यांनी आपल्या भाषणातून सर्वांना शुभेच्छा दिल्या .मोनाली चौधरी यांनी आभार मानले.


सरस्वती विद्यालय ः
आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंदराव दाभाडे, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सचिव अजित गरुड, विद्यालयाच्या प्राचार्या साधना दातीर, उप-प्राचार्य विजय बच्चे, आकुर्डी उन्नत केंद्राचे प्रदीप शिंदे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका सुरेखा वाळुंज उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय गणेश भोने यांनी करून दिला. आकांक्षा हनुमंत कांबळे, सिद्दिकी आलमस हयातअली, वैष्णवी शिवनाथ ढाकणे आणि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा शिष्यवृत्ती मिळविलेल्या श्रावणी सुहास वराडे, तनिषा काटळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ज्येष्ठ शिक्षिका संगीता गुरव यांनी उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सानिका पाटोळे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शीतल शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन सरीता खेनट व आभार तनुजा
सुरवसे यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.