संदीप वाघेरे युवामंचच्यावतीने 
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

संदीप वाघेरे युवामंचच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

Published on

पिंपरी, ता. ५ ः संदीप वाघेरे युवामंचच्यावतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे व यशदा पुणेचे डॉ. बबन जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काव्या बाणेकर या विद्यार्थिनीस लॅपटॉप तसेच ध्रुवलुथ्रा व आरजू कांबळे यांना टॅब तसेच सान्वी गव्हाणे, सांची निकाळजे या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच बारावीच्या मुलवानी वंशिका या विद्यार्थिनीस लॅपटॉप तसेच यादव भूमिका व माळी तनिशा यांना टॅब पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्युनिअर केजी ते इयत्ता आठवीच्या सुमारे ७५९ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वस्ताद दत्तोबा नाणेकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, रामदास कुदळे, किसन कापसे, विजय जाचक, संदीप कापसे, शेखर अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. आयोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, सदस्य गणेश मंजाळ, सचिन वाघेरे, रंजना जाधव, पवन हिरवे, मयूर बोडगे, समीर वाघेरे, अपूर्वा खोचाडे,शीतल पोतदार, दीपा काळे यांनी केले. कार्यक्रमास वस्ताद दत्तोबा नाणेकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, रामदास कुदळे, किसन कापसे, विजय जाचक, संदीप कापसे, शेखर अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.