वन्यजीव रक्षकाच्या सतर्कतेमुळे
वाचले महिलेचे प्राण

वन्यजीव रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ६ : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले.
बुधवारी (ता. ५) मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सोमाटणे येथील चौराईनगरमधील एका खोलीतील महिलेच्या अंथरुणात विषारी नाग शिरला. झोपलेल्या महिलेच्या अंगावरून साप गेल्याने त्यांच्या हाताला गार व मऊ लागल्याची चाहुल झाली. त्यांनी त्यांच्या पतीला उठवले व घरमालकाला सांगितले त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विलास गायकवाड यांना फोन करून माहिती दिली. गायकवाड यांनी लगेच तिथे जाऊन पाहिले तर तो विषारी नाग होता. नागाला सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या जागेत सोडून देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.