स्वामी विवेकानंद मध्ये
गुरुपौर्णिमा उत्साहात

स्वामी विवेकानंद मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ६ : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, सुजाता गुंजाळ, धनश्री पाटील, सरोदे तेजस्विनी उपस्थित होते. मानसी राऊत हिने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुरक्षा कटरे हिने केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, सचिव मिलिंद शेलार, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींनी गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करावे. स्वतः चा विकास करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.