अवतीभवती

अवतीभवती

Published on

आयसीएसआय व रोटरी क्लब
तर्फे सीएचा सन्मान
पिंपरी ः निगडी येथील आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखा आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने सीए दिनानिमित्त सीएना सन्मानित करण्यात आले. यावेळी दुर्गा टेकडीवर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अवयवदान प्रतिज्ञा, स्वच्छ भारत अभियान, वॉल्कथॉन असे उपक्रम राबविण्यात आले. ६५ जणांनी रक्तदान केले तर दुर्गाटेकडीवर ३० झाडांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष हरबिंदरसिंग दुल्लत, सचिव शशांक फडके, आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए सचिन बंसल, उपाध्यक्ष पंकज पाटणी, विकासाचे अध्यक्ष वैभव मोदी, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते. यावेळी वीस वर्षे अकौटींग क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या सीएंना सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी मध्ये सत्यनारायण चौबे, योगेश म्हाळसकर, सुहास गार्डी, किशोर गुजर, रवी राजापूरकर, मनोज अगरवाल, प्रकाश पमनाणी, माधव महाजन, प्रा. अशोककुमार पगारिया, केतन पारेख, राहुल सोमानी, अतुल कुलकर्णी, राजेंद्र गुप्ता, सुमोद खोत, महावीर कोठारी, संतोष जाधव, पंकज पाटणी, ए. के जैन, सोमेश्वर काळभोर,नंदकिशोर तोष्णीवाल, संतोष सॅलियन, गणेश आगरवाल, आनंद खेमका, चेतन पारेख, संतोष संचेती यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन वैष्णवी डांगले व इसिका पारेख यांनी केले. तर आभार पंकज पाटणी यांनी मानले.

मॉडर्न प्राथमिक मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात
मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर निगडी येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील उपशिक्षक नरेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली. प्रास्ताविकात प्रशालेचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे यांनी आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितली. तसेच इयत्ता चौथी शिवनेरी गटातील विद्यार्थी सोहम पडवेकर याने गुरुशिष्य परंपरेवर आधारित कथा सांगितली. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा रेणुका पडवेकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा वर्षा आजरेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षिका माया सूर्यवंशी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका सुजाता कुलकर्णी यांनी आभार मानले.

डॉ. नीरज व्यवहारे यांची फार्माकोलोजी
अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फार्माकोलॉजी या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विद्यापीठात पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी डॉ. व्यवहारे यांची एकमताने निवड करण्यात आली. डॉ. व्यवहारे यांचे नव्वदपेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. व्यवहारे यांनी आजपर्यंत फार्मसी शिक्षण क्षेत्राशी संबंधित सोळा पुस्तकांचे लिखाण केले आहे. सत्तरपेक्षा अधिक पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आपल्या संशोधनाच्या माध्यमातून ते अनेक औषध कंपन्यांसोबत निगडित आहेत.

लायन्स क्लबकडून खारावडेच्या शाळेला एक लाखाची मदत
खारावडे (ता. मुळशी) येथील शाळेला स्वच्छता गृह बांधणीसाठी एक लाखाचा धनादेश लायन्स क्लब चतुशृंगीचे अध्यक्ष विजय भिसे यांच्या हस्ते सरपंच लक्ष्मण मारणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याच वर्षात पुणे शहरातील मनपाच्या भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेला देखील कायमस्वरूपी ग्रंथालय उभारणीसाठी ५१ हजाराची पुस्तके प्रदान करण्यात आली. ही मदत ‘बुक बँक’ या उपक्रमाअंतर्गत प्रतिवर्षी देण्यात येईल. मुळशी तालुक्यातीलच रिहे येथील शाळेला कॉम्पुटर प्रिंटर भेट देण्यात आला. आंदगाव येथील शाळेला रोबोटिक्स लॅबची उपकरणे प्रदान करण्यात आली. खारावडे येथील धनादेश स्वीकारताना म्हसोबा संस्थांच्या अध्यक्ष मधुरा भेलके यांनी लायन्स क्लबचे आभार मानले. लायन्स क्लबचे सचिव नितीन थोपटे, खजिनदार महेश खडके उपस्थित होते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.