अतिरिक्त आयुक्त वाघ यांची बदली

अतिरिक्त आयुक्त वाघ यांची बदली

Published on

अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे

पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची गुरुवारी (ता. ६) बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सोलापूर महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती झाली आहे. जितेंद्र वाघ यांची २१ सप्टेंबर २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांची सेवा त्यांच्या मूळ महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खोराटे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहायक आयुक्त म्हणून काम केले आहे.
फोटोः 53740

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.