Roshan Chatte
Roshan ChatteSakal

Sub Inspector of Police : चिंचवडच्या चट्टे कुटुंबीयांचे नाव ‘रोशन’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२० मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्यात रोशनची निवड झाली आहे.

पिंपरी - ‘अभ्यासाला २०२० मध्ये शून्यापासून सुरुवात केली. अन्य मुले छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यावर मी लक्ष केंद्रित केले. अगदी पाच-पाच गुणांच्या प्रश्नांचा सराव केला. टेस्ट पेपरचा भरपूर सराव केला अन् तिसऱ्या प्रयत्नात उपनिरीक्षक पद मिळवले.,’ असं चिंचवडचा रहिवासी रोशन चट्टे सांगतो.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२० मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्यात रोशनची निवड झाली आहे.

चिंचवडमधील रश्टन कॉलनीत रोशन राहतो. मूळ सोलापूरमधील असलेले चट्टे कुटुंब रोशनच्या जन्मापासून चिंचवडमध्ये स्थायिक आहे. वडील कल्याणराव चट्टे एका खासगी कंपनीत कँटीन सुपरवायझर होते, ते आता निवृत्त झाले. आई सुनीता या गृहिणी आहेत, तर भाऊ चेतन हे खासगी कंपनीत नोकरी करतात. रोशनच्या यशामागे कुटुंबाचा आणि मित्रांचा खंबीर पाठिंबा होता. रोशनचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण चिंचवडमध्येच झाले.

रोशन म्हणाला, ‘मी बी.कॉम पूर्ण केल्यानंतर यूपीएससी करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अभ्यासालाही लागलो. २०१६ मध्ये यूपीएससीची मुख्य परीक्षा दिली, मात्र थोड्या गुणांनी संधी हुकली. पुन्हा २०१७ मध्ये यूपीएससीची पूर्व परीक्षा दिली. त्यात अपयश आले अन् एमपीएससी करण्याचे ठरवले. एमपीएससीमध्ये दोनदा पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेत काही गुणांनी संधी हुकली. त्यानंतर २०२० मध्ये शून्यापासून अभ्यास करण्याचे ठरविले.

छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले. गट चर्चेवर जास्त भर दिला. फावल्या वेळात मी एका क्लासेसमध्ये इतिहास विषय शिकवायचो, त्याचा मला जास्त फायदा झाला. शिवाय यूपीएससीमुळे आकलनशक्ती वाढल्याने एमपीएससीच्या कोणत्याच पूर्व परीक्षेत मी नापास झालो नाही.’’

‘कोरोनामुळे परीक्षा चार ते पाच वेळा पुढे ढकलली, त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे निकालाला उशीर झाला. अखेर यश मिळाले. आगामी काळात डीवायएसपीसाठी अभ्यास सुरू करणार आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलामुलींनी बी प्लॅन तयार ठेवा. एकाच परीक्षेवर अवलंबून राहू नका.’

- रोशन चट्टे

रोशनच्या यशाचे गमक

- लॉकडाउनच्या काळात मराठी आणि इंग्रजीचे ऑनलाइन क्लास केले

- इंग्रजी, इतिहास, विज्ञान, लॉ या विषयांचा सखोल अभ्यास केला

- टेस्ट पेपरचा खूप सराव केला, प्रत्येक विषयाचे २०-२० पेपर सोडविले

- गट चर्चेवर अधिक भर दिल्यामुळे आत्मविश्वास वाढला

- मुख्य परीक्षेत तीनशे गुणांचे लक्ष ठेवले, त्यात ३०७ गुण मिळाले

- लॉमध्ये ५५ पैकी ५२ गुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com