व्ही. के. माटे हायस्कूल मध्ये
‘एक्सप्लोर कार्निवल’

व्ही. के. माटे हायस्कूल मध्ये ‘एक्सप्लोर कार्निवल’

Published on

पिंपरी, ता. ८ ः चिंचवड येथील व्ही. के. माटे हायस्कआूल ‘एक्सप्लोर कार्निवल’ आयोजित करण्यात आले होते. विविध शाळांतर्फे पंधरा सकारात्मक बदलांचे उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयाशी संबंधित उपक्रम असून त्याद्वारे अन्न-पाणी-ऊर्जा या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक समस्या नाविन्यपूर्णरित्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते.

लर्निंग लिंक फाउंडेशनच्या सुचिता सोनवणे, रोहिणी खेरे, सचेत सामल तसेच म्हाळसाकांत विद्याच्या ऊर्मिला जोशी, रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, व्ही. के. माटे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी सहभाग घेतला. तसेच व्ही. के. माटे हायस्कूल, विद्यानंद भवन हायस्कूल निगडी, अँग्लो उर्दू मुलींचे हायस्कूल कॅम्प पुणे, विश्वकर्मा विद्यालय बिबवेवाडी येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. व्ही. के. माटे हायस्कूलच्या श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा धूत व तनुजा मस्के यांनी सादर केलेल्या ‘बायोड-ग्रेडेबल ऊस बगॅस उत्पादन’ ने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच विद्यानंद भवन हायस्कूलच्या तनिशा जैन, मानस मोहकर, यांच्या कचरा वेगळे करणारे यंत्रने द्वितीय तर अक्ने उर्दू मुलीचे हायस्कूलच्या तस्मीया धनगे हिने सेंद्रिय/हर्बल साबणमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. लर्निंग लिंक फाउंडेशन तर्फे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.