डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करा
महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची सूचना

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करा महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांची सूचना

पिंपरी, ता. १० ः पावसामुळे शहरातील अनेक भागात डबके साचले आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कीटकनाशक फवारणी व धुरळणी करावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेच्या जनसंवाद सभेत सोमवारी केली. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासह विविध मागण्याही नागरिकांनी केल्या.
महापालिकेशी संबंधित नागरिकांना तक्रारी व अडचणी लवकरात लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभांचे आयोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केले जाते. सोमवारच्या (ता. १०) सभेत एकूण ४३ तक्रारवजा सूचना नागरिकांनी मांडल्या. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर आदींच्या अध्यक्षतेखाली सभा झाल्या. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे आदी उपस्थित होते. मागील जनसंवाद सभांमध्ये सूचना केलेली कामे पूर्ण केल्याबद्दल क्षेत्रीय क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा नागरिकांनी सत्कार केला.

जनसंवाद सभा कशासाठी?
शहरात होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभांचे आयोजन महापालिका करीत आहे. त्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयस्तरांवरील सभांसाठी स्वतंत्रपणे मुख्य समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहेत.

नागरिकांच्या तक्रारवजा सूचना
- डासांच्या निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी
- उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
- अनधिकृत फ्लेक्स व होर्डींगवर कारवाई करावी
- पीएमपी बसथांब्यांचे नूतनीकरण करावे
- ओपन जिमच्या साहित्यांची दुरुस्ती करावी
- पादचारी मार्गांवरील अतिक्रमण हटवावीत
- शहरातील वाढणाऱ्या रहदारीचे योग्य नियोजन करावे
- भूमिगत सांडपाणी वाहिन्या व चेंबर्स दुरुस्त करावेत
- पाणीपुरवठा योग्य दाबाने व पुरेशा प्रमाणात व्हावा
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com