मावळ प्रवक्तेपदी 
मिलिंद अच्युत यांची निवड

मावळ प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत यांची निवड

Published on

मावळ, ता. १० ः तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रमुख प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते याबाबत त्यांना पत्र देण्यात आले.
या वेळी विविध निवड करण्याचे जिल्हा उपाध्यक्ष नेते चंद्रकांत सातकर यांनी जाहीर केले. अच्युत यांच्याकडे मावळ तालुक्याच्या प्रमुख प्रवक्तेपदाची व प्रसिद्धीप्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार असल्याचे तसेच जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार असल्याचे अच्युत यांनी नमूद केले. पुणे शहरातील माजी नगरसेवक संजय बलगुडे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सातकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश पारगे आदी उपस्थित होते.

PNE23T54462

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.