शहराचा पाणीपुरवठा 
उद्या बंद राहणार

शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

Published on

पिंपरी, ता. ११ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी(ता. १३) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्‍यक साठा करून ठेवावा, असे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.