सदा खोत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

सदा खोत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

Published on

सदाभाऊ खोत यांचा निषेध
पिंपरी, ता. ११ : शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फ मंगळवारी (ता. ११) पिंपरी येथे जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, ‘‘खोत यांना राजू शेट्टी व गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने लायकी नसताना मंत्रिपद मिळाले. मात्र, त्यांनी त्यांच्याशी दगाफटका केला. वास्तविक खोत व त्यांच्या मुलाची पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेमध्ये निवडून येण्याची कुवत नाही.’’ यावेळी ओमप्रकाश मोरया, इरफान चौधरी, नाना कसबे, सलीम डांगे, आबा शेलार, जय जाधव, हरी भोई आदी उपस्थित होते..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.