त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्याच्या
चोवीस मीटर रुंदीकरणास मान्यता

त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्याच्या चोवीस मीटर रुंदीकरणास मान्यता

पिंपरी, ता. २६ ः निगडीतील त्रिवेणीनगर चौक ते देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रुंद रस्ता विकसित केला जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. इंद्रायणी नदीच्या कडेने जाणारा मंजूर विकास योजनेतील रस्ता विकसित करण्याच्या खर्चासही त्यांनी मान्यता दिली.

महापालिका स्थायी समितीची बैठक प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात विविध विकास कामांना व त्यांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,  विजयकुमार खोराटे उपस्थित होते. यावेळी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार वाटप करण्यासाठीचा खर्च, एमआयडीसी परिसरासह मोरवाडी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण; निगडी-भोसरी टेल्को रस्त्यावरील केएसबी चौक ते यशवंतनगर चौकापर्यंत टाटा मोटर्स कंपनीलगत सीमाभिंत बांधणे; नाशिक फाटा उड्डाणपुलावर बस स्थानक बांधण्यासाठीचा सुधारित खर्च; शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बीआरटी रस्ते व अठरा मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे; झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या सर्व इमारती व स्वच्छतागृहांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे; कासारवाडी येथे भाजी मंडई शास्त्रीनगर इमारतीसाठी नवीन वीज मीटर घेण्यासाठी महावितरणला रक्कम देणे अशा खर्चास मान्यता देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com