व्हॉटसअप न्युज

व्हॉटसअप न्युज

नागरिकांची बातमीदारी
----------------------
तळेगाव स्टेशन परिसरात
अपुऱ्या रस्त्यामुळे गैरसोय
तळेगाव दाभाडे शहरातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण महामार्गावर स्टेशन भागात तीन चार महाविद्यालये आणि दोन मराठी माध्यमांच्या शाळांमधून सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी शिकत आहेत. मुख्य भाजी मंडई याच रस्त्याकडेला आहे. समोर नगर परिषदेची मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने ये-जा करतात, एकेरी रस्ता असल्याने पादचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना चालायला रस्ता अपुरा पडतो. त्यातच पावसाळ्यात या ठिकाणी गेली बारा पंधरा वर्षात दरवर्षी नगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठिकाणी साइड गटार तुंबून रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. शाळा-महाविद्यालये भरताना आणि सुटल्यावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकरीचे होत आहे. वाहने सुसाट असल्याने जीव मुठीत धरून रस्त्याच्या मधूनच सर्वांना चालावे लागते. या ठिकाणी अनेक अपघातात अनेक बळी जाऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. वेळोवेळी सामाजिक बांधकाम खाते आणि तळेगाव नगर परिषदेकडे तक्रारी करूनही यावर काहीच कार्यवाही केली नाही. ‘सकाळ’मधून अनेकदा बातमीतून प्रकाश टाकला. तरीही संबंधित प्रशासन ढिम्म आहे. एखादा मोठा अपघातात बळी गेल्यावरच प्रशासकीय यंत्रणा जागी होणार का? नवनियुक्त मुख्याधिकारी एन .के. पाटील यांनी यावर त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांना आणि पादचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी नागरिक आणि पालकांची आग्रही मागणी आहे.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे

पिंपरीत बेकायदा पार्किंग
पिंपरी कॅम्प येथील रिव्हर रोडच्या मार्गावर ‘पीएमपीएमएल’च्या दोन्ही बाजूला चारचाकी आणि ट्रक उभे केले जातात. त्यामुळे बसला जाण्यास अडचण येते. कधी तातडीने असेल किंवा रुग्णवाहिका असेल तर एखादाचा जीव जाईल. त्यामुळे वाहतूक विभाग आणि महापालिकेकडे लक्ष द्यावे.
- विवेक कुलकर्णी, पिंपरी

चिंचवडमधील स्वच्छतागृहाची दुरवस्था
चाफेकर वाचनालय आणि येथील बागेत असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुरवस्था आणि मोरया गोसावी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला प्रचंड मोठा खड्डा, याविषयी तक्रार केली आहे. अतिशय खराब अवस्थेत असणाऱ्या अनेक समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. पण महापालिका याकडे लक्ष देत नाही.
- दिगंबर ताम्हाणे, चिंचवडगाव


खासगी प्रवासी बसमुळे वाहतूक कोंडी
काळेवाडी येथील तापकीर चौकात खासगी प्रवासी बसला परवानगी नसताना तेथून बेकायदा वाहतूक चालू आहे. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे.
-विवेक तापकीर

टपाल कार्यालय परिसराची दुरवस्था
तळेगाव दाभाडे यशवंतनगर येथील टीजीएच टपाल कार्यालयात प्रवेश करणे फारच अवघड झाले आहे. आत जाताना त्या वाटेवरच पेव्हिंग ब्लॉक उखडलेले आहेत. त्याच्या बाजूलाच पावसामुळे पाण्याची डबकी साचली आहेत. टपाल कर्मचारी तेथून कसे जात येतात. टपाल कार्यालयात साधारणपणे ज्येष्ठ नागरिक येत असतात. अशा परिस्थितीत जर कोणाचा पाय घसरला तर दुखापत होण्याची शक्यता आहे. पुढे वर चढायला चार-पाच मोठ्या पायऱ्या आहेत. एका बाजूला टपाल कार्यालय तर दुसऱ्या बाजूला वाचनालय आहे. मधल्या छोट्याशा जागेत लहान मुलांचे शिशू वर्ग भरतात. ती मुले तिथेच दाटीवाटीने एखाद्या सतरंजीवर बसलेली असतात. येणारे-जाणारे चपला घालून तिथूनच चालत असतात. तिथेच ती लहान मुले खाऊ खात असतात. हे सर्व त्या लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेणे सर्वांच्याच सोईचे होईल.
- प्रकाश वा. दातार, यशवंतनगर तळेगाव दाभाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com