शहरात २०२६ पर्यंत ३० टक्के ई-वाहने  
महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची माहिती, महापालिका सज्ज

शहरात २०२६ पर्यंत ३० टक्के ई-वाहने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांची माहिती, महापालिका सज्ज

--------------------------------------

पिंपरी, ता. २६ ः महापालिकेच्या इलेक्ट्रीक व्हेईकल सेल आणि आरएमआय इंडिया (रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट) यांच्या साह्याने ‘पिंपरी चिंचवड सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल रेडिनेस’ आराखडा तयार करण्यात आला. या माध्यमातून शहरात २०२६ पर्यंत ३० टक्के ई-वाहनांचा वापर वाढणार असून, ते प्रभावीपणे वापरासाठी शहर सज्ज असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत ई-वाहन वापर वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. त्यात सिंह बोलत होते. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपी) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुचेंद्र प्रताप सिंह, आरएमआय इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अक्षिता घाटे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह पुणे महापालिका, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग, महामेट्रो यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी ‘पिंपरी-चिंचवड सिटी इलेक्ट्रिक व्हेईकल रेडिनेस प्लॅन’चे प्रकाशन झाले.

महापालिकेने २०२३ अखेरपर्यंत किमान १०० सार्वजनिक किंवा निमशासकीय चार्जिंग व स्वॅपिंग पॉइंट्सची स्थापना करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२५ पर्यंत ही संख्या किमान पाचशेपर्यंत वाढेल.
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

पीएमपीच्या ताफ्यात ४५० हून अधिक ई-बस आहेत. वर्षअखेरपर्यंत अतिरिक्त १५० ई-बस आमच्या ताफ्यात आणण्याचे नियोजन आहे. चार्जिंग स्टेशनची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
- सचिंद्र प्रताप सिंह, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
चर्चेतील विषय...
- शहरात दरवर्षी सुमारे दीड लाख नवीन वाहनांची नोंदणी
- २०२१ पूर्वी नवीन वाहन नोंदणीत शहरातील ईव्हीचा वाटा एक टक्के
- २०२१ मध्ये एकूण एक लाख आठ हजारामध्ये चार टक्के ई-वाहने
- चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्यांना दोन टक्के व गृहनिर्माण सोसायट्यांना पाच टक्के करसवलत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com