पिंपरी आरोग्य पुरवणी लेख डॉक्टर गोफणे

पिंपरी आरोग्य पुरवणी लेख डॉक्टर गोफणे

Published on

दर्जेदार आरोग्य सेवेचा वसा

उत्तम आरोग्य हेच प्रत्येकाचे धन आहे. हीच संपत्ती आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपले, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार आरोग्य सेवेचा हाच वसा घेऊन महापालिका शहरातील नागरिकांसाठी अविरत कार्यरत आहे. त्याअंतर्गत, गरजू रुग्णांना पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मल्टिस्पेशालिटी सुविधा पुरविण्यात आली आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका
--------------------------
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगाने बदल घडत आहेत. एक्स-रे च्या अहवालावरून निदान करण्यापासून आता रोबोटिक सर्जरीपर्यंत वैद्यकीय क्षेत्राची प्रगती झाली आहे. शहर परिसरात अनेक खासगी स्पेशालिटी, मल्टिस्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत असून त्यात आणखी भर पडत आहे. मात्र,
समाजातील निम्न मध्यमवर्गीय अथवा मध्यमवर्गीय लोकांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे हे दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. परिणामी, अनेक रुग्ण दर्जेदार उपचार घेऊ शकत नाहीत. हीच बाब हेरून पिंपरी-चिंचवड महापालिकेने यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालय उभारले. त्यापाठोपाठ आठ रुग्णालये उभारली आहेत. यात पिंपरी येथील जिजामाता, चिंचवडचे तालेरा, यमुनानगर, भोसरी, सांगवी, आकुर्डी, थेरगाव आदी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यांच्या खाटांची क्षमता आणि सुविधांमध्ये वाढ केली आहे. मोहल्ला क्लिनिक, जिजाऊ क्लिनिक उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मासुळकर कॉलनीत नेत्ररुग्णालय सुरू केले आहे. पिंपरीत नवीन जिजामाता, थेरगावमध्ये नवीन थेरगाव, भोसरीमध्ये नवीन भोसरी आणि आकुर्डीत ह.भ.प.प्रभाकर कुटे अशी चार नवीन रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅंट उभारले आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये मल्टिस्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत. तेथे सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या चारही रुग्णालयांत ‘आयसीयू’ व व्हेंटिलेटर खाटा आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीत महापालिकेची रुग्णालये स्वयंपूर्ण झाली आहेत. नवीन भोसरी, नवीन जिजामाता व आकुर्डी रुग्णालयांतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प क्षमता ९६० एलपीएम अर्थात लिटर प्रतिमिनिट आहे. तर, थेरगाव रुग्णालयातील प्लॅंटची क्षमता १०५० एलपीएम आहे. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून निर्माण होणारा ऑक्सिजन सुमारे ४५० ऑक्सिजन बेड आणि ५० व्हेंटिलेटर बेडला पुरवला जाऊ शकतो. श्वसनक्रिया, हृदयाचा झटका, कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा आणि गंभीर रक्तस्राव अशा रुग्णांसाठी ऑक्सिजन वापरला जातो. निमोनिया, हृदयविकार यासह फुफ्फुसांची क्षमता कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. ‘वायसीएम’ मध्ये दोन ‘आयसीयू’ युनिट आहेत. हृदयविकारासंदर्भात रूबी अलकेअर आहे. नर्सिंग व पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी ‘वायसीएम’च्या आवारात स्वतंत्र इमारत बांधली आहे. या माध्यमातून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

रुग्णालयांतील बेड संख्या
वायसीएम रुग्णालय ७५० खाटांचे आहे. नवीन थेरगाव रुग्णालय २००, नवीन भोसरी रुग्णालय १००, नवीन जिजामाता रुग्णालय १२०, ह.भ.प.प्रभाकर कुटे रुग्णालय, आकुर्डी १३०, सांगवी रुग्णालय १५, यमुनानगर रुग्णालय २० आणि तालेरा रुग्णालय ४५ अशा एकूण १३८० खाटांची सुविधा आहे.

रुग्णांसाठी सेवा, सुविधा
वायसीएम हे पोस्ट ग्रॅज्युएट अर्थात एमडी, एमएस संस्था आहे. मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. कार्डियाक व न्यूरो सर्जरी विभाग आहे. रक्तपेढी आहे. २४ तास सुविधा उपलब्ध आहे. सांगवी, यमुनानगर व तालेरा रुग्णालयात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बाह्यरुग्ण विभाग आहे. या रुग्णालयांत केवळ प्रसूतीची सुविधा आहे.

जन्म-मृत्यू नोंदणीची व्यवस्था
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प.प्रभाकर कुटे

रुग्णालय आकुर्डी, सांगवी रुग्णालय, तालेरा रुग्णालय, पिंपरी वाघेरे दवाखाना, फुगेवाडी दवाखाना, प्राधिकरण दवाखाना आदी ठिकाणी नागरिकांसाठी जन्म-मृत्यू नोंदणीची व्यवस्था आहे.

अन्य सुविधा
विवाह नोंदणीची व्यवस्था महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपलब्ध आहे. या कार्यालय क्षेत्रातील रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी त्याचे प्रमुख आहेत. शहरात ५७५ खासगी रुग्णालये आहेत. पास्को संस्थेतर्फे जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. आकुर्डी रुग्णालयात क्षयरोग विभाग कार्यरत आहे.

रुग्णालयांना ‘लक्ष्य’ प्रमाणपत्र
केंद्र सरकारने महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयाला ‘लक्ष्य’ (LAQSYA) प्रमाणपत्र दिले आहे. नवीन आकुर्डी रुग्णालयातील प्रसूती कक्ष, नवीन तालेरा, नवीन जिजामाता, नवीन थेरगाव व यमुनानगर रुग्णालयांस राज्य सरकारचे ‘लक्ष्य’ (LAQSYA) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

कायाकल्प
महापालिकेच्या नेहरूनगर येथील दवाखान्यास राज्य सरकारचे कायाकल्प प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. नवीन भोसरी रुग्णालयास प्रथम उपविजेता आणि ह.भ.प.प्रभाकर कुटे रुग्णालयास द्वितीय उपविजेता पारितोषिक प्राप्त झाले आहे. नवीन तालेरा, नवीन जिजामाता, नवीन थेरगाव व नवीन आकुर्डी रुग्णालये २०२१ पासून कार्यान्वित झाली आहेत.

‘वायसीएम’वरील ताण कमी
नवीन भोसरी, नवीन जिजामाता, नवीन थेरगाव व ह.भ.प.प्रभाकर कुटे, आकुर्डी या रुग्णालयांमध्ये रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, शस्रक्रिया, विशेष व अतिविशेष बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आदी सेवा देखील पुरविल्या जात आहेत. या रुग्णालयांतील सुविधांमुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी होत असताना दिसत आहे.
(शब्दांकन ः पीतांबर लोहार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com