‘डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी’ला पुरस्कार

‘डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी’ला पुरस्कार

पिंपरी, ता. २१ ः आयबीसीएलसीच्या (आंतरराष्ट्रीय प्रमाणित-दुग्धपान सल्लागार समिती) वतीने डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला उत्कृष्ट कामगिरीसाठी जागतिक मान्यता कार्यक्रमांतर्गत ‘२०२३ आयबीसीएलसी हॉस्पिटल-सर्वोत्तम शुश्रूषा रुग्णालय पुरस्कार’ मिळाला आहे. स्तनपानाला प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी युनिसेफ महाराष्ट्राच्या पोषण विशेषतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर व ‘बीपीएनआय महाराष्ट्र’च्या अध्यक्ष डॉ. सुषमा मलिक उपस्थित होत्या.
आयबीसीएलसी (इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाइड लॅक्टेशन कन्सल्टंट) हे स्तनपान सल्लागार प्रशिक्षणातील सर्वोच्च स्थान मानले जाते. सध्या १२५ देशांमध्ये ३३,४९२ आयबीसीएलसी कार्यरत आहेत. बाळाची आई व कुटुंबीयांना स्तनपानाचे महत्त्व, स्तनपान आहाराबाबत प्रशिक्षण, तज्ज्ञ साहाय्य व सल्ला देण्यासाठी हे तज्ज्ञ कार्यरत आहेत. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सहा वेळा आयबीसीएलसी सन्मान मिळाला आहे.
या रुग्णालयाकडून ‘यशोदा’ ही आधुनिक मानवी दुग्धपेढी चालविली जात आहे. याद्वारे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, अकाली जन्मलेल्या बालकांसाठी व कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या बालकांसाठी मानवी दूध उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात सुरू करण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे .

‘कोणत्याही एका समृद्ध राष्ट्राची सुरुवात ही निरोगी मुलांपासून होते व त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. बालकांच्या पोषणाबाबत समाजावर सकारात्मक बदल व्हावा यासाठी मी प्रयत्न करीत आहे. स्तनपान करताना मातांना भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देणाऱ्या सर्वोत्तम आरोग्य सुविधा आणण्याकडे माझा कल आहे.’
- डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com