सार्वजनिक उद्योग हे देशाची मंदिरे : सी. श्रीकुमार

सार्वजनिक उद्योग हे देशाची मंदिरे : सी. श्रीकुमार

पिंपरी, ता. २१ : ‘‘भारतात स्वातंत्र्यानंतर खनिज, कोळसा, तेल, वायू, इंधन, दळणवळण, हवाई वाहतूक, नौकानयन, औषध निर्माण, टेलिकॉम, अवजड उद्योग, विद्युत, संरक्षण आदी सर्व उत्पादन, संशोधन क्षेत्रात सरकारी उद्योगांनी देदीप्यमान प्रगती केली. हे सरकारी क्षेत्र मोठे योगदान देत होते. त्यामुळे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाची मंदिरे असे म्हणाले होते,’’ असे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव सी. श्रीकुमार यांनी सांगितले.
खडकी येथे एमटीएसएसडी वर्कर्स युनियनच्या (रणगाडा डेपो) कार्यालयात कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्रीकुमार म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशाला औद्योगिक क्षेत्रात प्रगतीसाठी सार्वभौम व आत्मनिर्भर सार्वजनिक उद्योगांनी मागील सहा दशकात बनवले आहे. नफा कमविण्यासाठी कार्पोरेट उद्योगपतींना सरकार हवाई वाहतूक, विमानतळ, तेल, वीज, कोळसा व इतर सर्व सरकारी उद्योग विकत आहेत. कोरोना काळात खासगी क्षेत्राने राष्ट्रीय जबाबदारी झटकली. सरकारची रेल्वे, संरक्षण उद्योगातील कारखाने, सरकारी आरोग्य यंत्रणा देशभर महामारीविरोधात काम करीत होती. आज सरकारकडे स्वतःच्या मालकीची विमान कंपनी नाही, हळूहळू हे खासगीकरण देशाची आत्मनिर्भर अर्थव्यवस्था नष्ट करणार आहे.’’ या वेळी सलीम सय्यद, मोहन होल, विशाल डुंबरे, अमित गजमाल, सोन्याबापू घोगरे, दिनेश भिंताडे, दिलीप अंबवणे, हेमंत काकडे, अभिनंदन गायकवाड, सचिन कांबळे, राधा माच्रेकर, रमेश दीक्षित आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com