
जैन महासंघातर्फे आजपासून अहिंसा सप्ताह
पिंपरी, ता. २७ ः भगवान महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड जैन महासंघातर्फे मंगळवारपासून (ता. २८) चार एप्रिलपर्यंत अहिंसा सप्ताह आयोजित केला आहे. त्याअंतर्गत सामाजिक आणि मानवसेवेच्या अनुषशंगाने विविध २८ कार्यक्रम होणार आहेत. त्यात अहिंसा फेरी, पदयात्रा, पुरस्कार वितरण आणि भक्ती संगीत अशा कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी (ता. ४) महावीर जयंती आहे. त्यानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर ः जैनस्थानक भोसरी ः सकाळी १० ते ४. तीर्थंकर वाटिका वृक्षारोपण ः लिनियर गार्डन पिंपळे सौदागर ः सकाळी ८.३०. फलवितरण ः पारसभवन चिंचवड ः सकाळी ११ ते १२ ः रक्तदान व आरोग्य तपासणी ः जैन स्थानक चिंचवड स्टेशन ः सकाळी ९ ते दुपारी १. अहिंसा रॅली ः रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव ते आरएमडी स्कूल चिंचवडगाव. दुपारी ३.३० ते ६. अहिंसा पदयात्रा आरएमडी स्कूल ते प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह ः सायंकाळी दुपारी ६ ः अहिंसा पुरस्कार वितरण व भक्तीसंध्या संगीत कार्यक्रम ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड ः सायंकाळी ६.३० ते रात्री १० असे कार्यक्रम होतील. महासंघाचे कार्याध्यक्ष श्रेयस पगारिया, महामंत्री विजय बिलावड, कोषाध्यक्ष सुभाष ओसवाल, हितेश सुराणा, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
अहिंसा सप्ताहातील कार्यक्रम
- मंगळवार (ता. २८) ः भक्तामर पठण आनंद दिंडी आणि आचार्य आनंद ऋषीजी मसा पुण्यस्मृतिदिन ः सकाळी ८ ते ११. स्तन कर्करोग व थायरॉईड तपासणी शिबिर ः सकाळी ११ ते दुपारी १ ः पगारिया सभागृह, कासारवाडी.
- बुधवार (ता. २९) ः प्राथमिक आरोग्य तपासणी व कॅन्सर स्क्रीनिंग शिबिर ः दुपारी १ ते ५ ः तालेरा हॉस्पिटल, चिंचवड.
- गुरुवार (ता. ३०) ः नेत्र व दंतचिकित्सा आणि मोफत चष्मे वाटप शिबिर ः सकाळी १० ते दुपारी ४ ः धारिवाल स्थानक भवन पिंपळे गुरव.
- शुक्रवार (ता. ३१) ः सांस्कृतिक कार्यक्रम ः सायंकाळी ७ ते ० ः पारस भवन चिंतामणी जिनालय, चिंचवड. क्षय रुग्णांना आहार वाटप ः थेरगाव हॉस्पिटल.
- शनिवार (ता. १) ः रक्तदान शिबिर ः राजश्री सिमंदर सोसायटी, शिवराजनगर, रहाटणी ः सकाळी ९ ते दुपारी २ ः रुग्णांना फळ वाटप ः तालेरा हॉस्पिटल चिंचवड ः भक्ती स्तवन स्पर्धा, प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड स्टेशन ः दुपारी ३. पाककला स्पर्धा ः दिगंबर जैन मंदिर निगडी ः दुपारी ३ ते ५.
- रविवार (ता. २) - जीवदया ः महाराणा प्रताप गो शाळा चिंचवडगाव ः सकाळी १० ः दिव्यांग विद्यार्थी कवी संमेलन ः पताशीबाई लुंकड अंधशाळा भोसरी पांजरपोळ ः सकाळ १०.३०. महावीर की रोटी भोजन वाटप ः रहाटणी चौक. रांगोळी स्पर्धा ः पारस भवन, प्लॉट नंबर ६२, उद्यमनगर, चिंचवड ः दुपारी ४ ते सायंकाळी ६. व्याख्यान ः भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाची गरज ः वक्ते उल्हास पवार. सायंकाळी ६ ः दिगंबर जैन मंदिर निगडी. भक्तीगीत कार्यक्रम ः सायंकाळी ७. गरजू संस्थांना धान्य वाटप ः सायंकाळी ७ ः दिगंबर जैन मंदिर निगडी. घर पर मंगलाचार ः मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवड ः सायंकाळी ७ ते रात्री ९.३०
- सोमवार (ता. ३) ः रक्तदान व नेत्रदान शिबिर ः सकाळी ९ ते १ ः दिगंबर जैन मंदिर निगडी.