अजित करवंदे ठरला मावळ चषक कुस्तीचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजित करवंदे ठरला 
मावळ चषक कुस्तीचा मानकरी
अजित करवंदे ठरला मावळ चषक कुस्तीचा मानकरी

अजित करवंदे ठरला मावळ चषक कुस्तीचा मानकरी

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २९ ः पै. सचिनभाऊ घोटकुले मित्र मंडळ व आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पै. चंद्रकांत सातकर व ऑलिंपिकवीर मारुती आडकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, पै. सचिन घोटकुले यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत एकूण दोनशे पन्नास कुस्तीगीर सहभागी झाले होते. मावळ चषकासाठी अजित करवंदे विरुद्ध संकेत ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये करवंदे यांनी बाजी मारत मावळ चषकाचा मान मिळवला. यावेळी मनोज येवले, तानाजी कारके, किशोर सातकर, देवा गायकवाड, संभाजी राक्षे उपस्थित होते.

निकाल खालीलप्रमाणे ः
लहान गट मुले
(२२ किलो वजनी) गट - चेतन चिमटे, पवन दळवी,
(२५ किलो वजनी गट)- श्रावण बोडके, अमन ठुले,
(२८ किलो वजनी गट)- ओम काळे, अनुज डुकरे.
(३२ किलो वजनी गट) - स्वराज बोडके, तुषार शिंदे.
(३५ किलो वजनी गट)- राजवजी घारे, मोहित दाभाडे
(३८ किलो वजनी गट)- वेदांत भोईर, मयूर सुपे
(४२ किलो वजनी गट)- संकेत चांदेकर, चैतन्य ठाकर.
(४५ किलो वजनी गट) - कार्तिक आडकर, शौर्य गोपाळे
(४८ किलो वजनी गट) - साहिल दगडे, महेश खमसे.
(५१ किलो वजनी गट)- मयूर आखडे, धिरज शिंदे,
(५५ किलो वजनी गट)- तेजस कारके, ओम वाघोले
(६० किलो वजनी गट)- साहिल आंद्रे, कौशक घोटकुले.
(महिला गट)- सावरी सातकर, सनम शेख.

वरिष्ठ गट ः (५७ किलो वजनी गट)- सतीश मालपोटे, स्वप्नील काटे, (६१ किलो वजनी गट) - अभिषेक हिंगे, सागर जांभूळकर, (६५ किलो वजनी गट)- वैष्णव आडकर, प्रतीक येवले, (७० किलो वजनी गट) - समीर घारे, भूषण वाळूंज.