
महापिलकेच्या आयटीआयमधील बारा जणांची निवड
पिंपरी, ता. ३१ ः औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थ्याची अंतिम परीक्षेपूर्वीच १२ जणांची एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे. एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पिंपरी या कंपनीने शिकाऊ उमेदवारीसाठी १७ औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी येथील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडच्या १८ जणांच्या मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या होत्या. १८ पैकी १२ प्रशिक्षणार्थ्यांची कंपनीने निवड केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा होण्यापूर्वी निवड झाल्याने प्राचार्य शशिकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक जगदीश न्हावकर व एचआर स्पेशालिस्ट केशव सिन्हा यांचे गटनिदेशक प्रकाश घोडके यांनी आभार मानले. प्रभारी गटनिदेशक रवींद्र ओव्हाळ, निदेशक विक्रमसिंह काळोखे, संस्थेचा माजी प्रशिक्षणार्थी सलमान शेख यांनी मार्गदर्शन केले.