अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः पिंपरी चिंचवड शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली.
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महासंघाचे चिंचवड येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या वेळी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजू बिराजदार, बालाजी लोखंडे, किरण साडेकर, संदीप कुमार, सुखदेव कांबळे, परमेश्वर बिराजदार, नाना कसबे, शंकर साळुंखे, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी मार्गदर्शन केले. संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड, संघटक नीलेश शेंडगे, सहसचिव योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते, दिलीप कैतके, राजेंद्र गाडेकर, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, शहर उपाध्यक्ष सचिन भिसे, परशुराम कड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या वतीने शिव भक्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. प्रभाग उपाध्यक्ष अशोक शिसोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रानवडे यांनी मार्गदर्शन केले. संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अध्यक्ष गोविंद खामकर, मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे, प्रभाग समितीचे सचिव विजय शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव सुरेश इंगळे उपस्थित होते.