अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम

पिंपरी, ता. १ ः महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय भोजने, बापू गायकवाड, उप अभियंता बाळासाहेब शेटे, संध्या वाघ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल, नितीन समगीर, चारुशीला जोशी, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोजने, संजय कवितके, रोहिदास पोटे, संजय शेंडगे, अच्युत लेंगरे, संजय नाईकवडे, दिलीप कवितके, विठ्ठल कवितके, जनसंपर्क विभागाचे वासीम कुरेशी, श्रेयश जाधव, महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सांगवी येथे अभिवादन
सांगवीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महापौर उषा ढोरे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, संतोष कांबळे, हर्शल ढोरे, आशा धायगुडे-शेंडगे, शारदा सोनावणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहायक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, अजय बिरू दुधभाते, सूर्यकांत गोफणे, जवाहर ढोरे, हिरेन सोनावणे, अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, सुधाकर सूर्यवंशी, मारुती भोलेकर, नवनाथ भिडे, विलास पाटील, विजयकुमार हारनोळ, नारायण भुरे, गोरेकाका, बळिराम घोडके, ज्ञानेश्वर भगत, कृष्णराव गिरगुणे, मेजर संभाजी गोफणे, माणिकराव देवकाते, विनायक पिंगळे, टेकाळे आदी उपस्थित होते.


रयत विद्यार्थीतर्फे पुतळ्याला पुष्पहार अर्पण
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मोरवाडी पिंपरीतील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सचिव नीरज भालेराव,संघटक रोहित कांबळे,सहसचिव प्रगती कोपरे उपस्थित होते.

सहारा वृद्धाश्रमास पुरस्कार प्रदान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर व महापालिकेचा पहिला कार्यगुण गौरव पुरस्कार मावळ तालुक्यातील सहारा वृद्धाश्रम या संस्थेस प्रदान करण्यात आला. मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी पुतळ्याजवळ हा पुरस्कार सोहळा झाला. रस्त्यावर सापडलेल्या अनाथ-निराधार आजी आजोबांचा विनामूल्य सांभाळ करणाऱ्या कुसवली (मावळ) येथील सहारा वृद्धाश्रम या संस्थेच्या प्रा. तृप्ती विजय जगताप व कमल काशिनाथ जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, आयुक्त शेखर सिंह, आमदार उमा खापरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक राजाभाऊ दुर्गे उपस्थित होते. प्रास्ताविक राजाभाऊ दुर्गे यांनी केले तर विजय बोत्रे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com