राजमाता जिजाऊंच्या 
स्मृतिदिनी अभिवादन

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी अभिवादन

Published on

पिंपरी, ता. १८ ः राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने थेरगाव येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी उमरगा शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचे राज्य उभारण्यास प्रेरणा दिली. स्वराज्य व सुराज्य निर्मितीचा आदर्श म्हणजेच राजमाता जिजाऊ असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष निरंजन सोखी, संघटक गणेश पारदे, बालाजी पाटील, मराठा सेवा संघाचे गजानन आढाव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.