लोकसहभाग, रोपदान, 
श्रमदानातून वृक्षसंवर्धन

लोकसहभाग, रोपदान, श्रमदानातून वृक्षसंवर्धन

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १८ : पर्यावरण आणि जैविक साखळीतील सहजीवी संतुलनात देशी प्रजातींच्या वृक्षवल्लीची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे देशीरोपांची लागवड आणि संगोपनावर भर देण्याचे आवाहन नगरपालिकेच्या येथील बायोडायव्हर्सिटी गार्डनचे मुख्य संवर्धक सचिन भांडवलकर यांनी केले.
लोकसहभागातून वृक्षारोपण या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी केलेल्या रोपदान आणि श्रमदानातून आंबा, आवळा, चिकू, जांभूळ, तुती ही फळझाडे तसेच अर्जुन, पिंपळ, वड ही रानझाडे आणि गंधफुलांची अशी एकूण ५५ प्रकारची रोपे यावेळी लावण्यात आली. यावेळी डॉ. गणेश सोरटे, डॉ. मनोज कोटीभास्कर, एस इन्फोटेकचे संचालक मयूर सातपुते, विजय कुलकर्णी, डॉ. एस. माणिक, मधुरा वेलणकर, अशोक अडसूळ, शिवाजी मातले, अखिलेश तेलंग, चंद्रकांत विसपुते, ओंकार भांडवलकर, मिलिंद देखणे, महादेव थोरात अशा आबालवृद्धांनी श्रमदान केले. लावलेल्या रोपांचे पावसाळ्यात संवर्धन करण्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी जबाबदारी घेतली आहे. वृक्षदत्तक उपक्रमातून गेल्या वर्षभरात नगरपालिकेच्या सुमारे साडेतीन एकर परिसरात देशी नव्या जुन्या वृक्षांचे संवर्धन केले असल्याचे डॉ. सोरटे यांनी सांगितले. सचिन भांडवलकर यांच्या प्रयत्नातून पक्षांसाठी कृत्रिम घरटी आणि फुलपाखरू उद्यानाचा अभिनव प्रयोग राबविल्याने गार्डन परिसरात सुमारे ४५ हून अधिक प्रजातींच्या पक्षांचा अधिवास झाल्याचे पक्षीप्रेमी मयूर यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगरपालिका आणि मावळ नवनिर्माण प्रतिष्ठान यांनी बायोडायव्हर्सिटी गार्डनच्या विकासाचा संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. सुमारे सहा एकर पैकी पहिल्या टप्प्यातील तीन एकर जागेवरील काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सचिन भांडवलकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

tas-१८-६-२३-P१-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : येथील बायोडायव्हर्सिटी गार्डनचे ग्रुप सदस्य वृक्षारोपण करताना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com