आषाढी वारी विशेषांक - निरंजन दास

आषाढी वारी विशेषांक - निरंजन दास

आषाढी वारी विशेषांक - निरंजन दास

वारी आणि अध्यात्म

इंट्रो - अध्यात्म हा विषय खरे तर प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक धारणेवर, श्रद्धेवर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे. अध्यात्माकडे जात असताना तुमची तशी मानसिकता असावी लागते. मानसिकतेने पहिले धारणा करावी लागते. वैचारिक फार महत्वाचे आणि मानसिकता सकारात्मक असेल तर विचारात बदल घडविता येतो.
-------------------------------
पाश्चात्य देशातील लोक म्हणतात की, अध्यात्म हा विषय सामूहिक नाही. परंतु, कुठेतरी जेव्हा आपण सामूहिक अध्यात्माची किंवा सामूहिक वास्तववादी गोष्ट करतो, तेव्हा वारीकडे बघताना हा मुद्दा आपल्याला ठळकपणे मांडता येतो. अध्यात्म हा विषय खरे तर प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक धारणेवर, श्रद्धेवर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे. अध्यात्माकडे जात असताना तुमची तशी मानसिकता असावी लागते. मानसिकतेने पहिले धारणा करावी लागते. वैचारिक फार महत्वाचे आणि मानसिकता सकारात्मक असेल तर विचारात बदल घडविता येतो. त्यानंतर, तुम्हाला सर्वांत महत्वाचे म्हणजे तुम्हाला एका नवीन शून्य अवस्थेत प्रवेश करावा लागतो आणि हा पूर्णपणे संबंधित व्यक्तीचा वैयक्तिक भाग आहे. उत्तमोत्तम ग्रंथांनी याला वर्णन करत असताना एकांतवासाची व्याख्या दिलेली होती.

‘एकांत’चा सुंदर अर्थ
जेव्हा आम्ही वारकरी संप्रदायाच्या वारीकडे पाहतो. तेव्हा, ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या अनुस्मृतीनुसार या संप्रदायाचे संस्थापकत्व आपण ज्ञानोबारायांकडे देतो. ‘एकांत’ या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीत खूप सुंदर असा दिला आहे. श्रीमत् भगवतगीतेनंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात मोठी संवाद प्रक्रिया जी केली ती मैत्री भावाने आणि मातृभावाने केली. हे जे मातृत्व मैत्रीपूर्ण आहे म्हणजे इथे संस्कारपण आहेत, आदरपण आहे. जवळीकताही आहे आणि सोबत खेळी-मेळीचे वातावरण देखील ठेवले आहे. याचाच, कुठेतरी उल्लेख नामदेवराय महाराज यांच्या ‘नाचू कीर्तनाच्या रंगी’ त दिसतो. ज्ञानेश्वर महाराज एकांताचा अर्थ जो सांगतात तो फार सुंदर सांगतात. कुठे तरी जंगलात घर-दार सोडून किंवा दरवाजा बंद करुन शरीराने एकटे बसणे हे ज्ञानेश्वरांना अपेक्षित नाही. ही व्याख्या करताना ते म्हणतात, ‘‘या जगात तुझे आणि माझे भगवंत आणि भक्ताचे नाते राहील.’’ त्यामुळे, द्वैतपणा अस्तित्वात आला. ज्ञानोबाराय म्हणतात, जेव्हा तुझा आणि माझा सख्य आणि समर्पित संवाद सुरु होईल. तेव्हा, तुझे आणि माझे स्वतंत्र अस्तित्व विरुन एकच राहील. त्यालाच, ज्ञानोबाराय ‘एकांत’ म्हणतात. या एकांताचा कुठेही दुसऱ्या कुणापासून व्यत्ययाचा किंवा परिणामांचा संबंध नाही. ज्ञानोबारायांच्या या एकांताला आपण समजून घेतल्यास कितीही मोठ्या संख्येने असलेल्या लोकांत देखील संवाद साधता येईल.

सामूहिक पद्धतीने धर्माची निर्मिती
ज्या दिवशी भगवंत आणि आपण एकरुप होऊ. त्यादिवशी देवाचे भगवंतपण आणि भक्ताचे भक्तपण विरुन जे काही एक राहील तो ‘एकांत’. असा हा ‘एकांत’ असलेल्या साधकाला कितीही लोकांचा गोंगाट, संगत असेल तरीही त्याचे अध्यात्मात कुठेही व्यत्यय येणार नाही. उलट, त्याच्या या अध्यात्माची लागण दुसऱ्याला लागून ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना’ ही तुकोबारायांची ओवी सार्थक ठरते. त्यामुळे, सामूहिक पद्धतीने धर्म घडायची भूमिका इथे वारीतून निर्माण होत असते. आजकाल धर्माची व्याख्या फार संकुचित झालेली आहे. धर्म म्हटला की, लोक आपापली विशिष्ट तत्वज्ञानाची भूमिका मांडण्याची मोकळीक मिळते. परंतु, आचरणात तो आणला जात नाही.

संतांसमवेत वारी करण्याचा नियम
ज्ञानोबाराय, तुकोबाराय अथवा सकल संत आम्हाला वारीबाबत सांगतात. तेव्हा, ते संविधान देतात. त्यात, तुम्ही कसे उठायचे ? किंवा कसे बसायचे ? हे सांगितले नाही. परंतु, त्यांनी त्यात, सर्वांत पहिला नियम सांगून ठेवला की, ही जी वारी आहे ती संतांसमवेत करायची आहे. यात, आपण देवाला प्राप्त करुन घ्यायला किंवा त्याला अनुभवायला सामूहिकतेकडून अध्यात्माकडे जातो. संतांसोबत वारी का करायची ? कारण, सकल संतांच्या गाथेत संतांच्या संगतीला देवांच्या संगतीपेक्षा मोठे म्हटले गेले आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ‘‘ते मज निरंतर जागवती.’’ हे संतच आहेत की, जे मनुष्याला कुठल्याही प्रकारची निद्रा येते. मग, ती वासनेची, मोहमायेची असते. त्यातून, ते मनुष्याला जागे करतात. तुकोबाराय महाराजांचे जे वचन आहे ना की, ‘चालविसी हाती धरुनिया.’ यात, संतांनी आपल्याला धरलेलेच नाही. तर प्रत्यक्ष भगवंतच आपल्याला सोबत घेऊन जात असतो. गुरु रुपाने भगवंताला त्याच्या पादुकांना त्याच्या चरणांना हदयात स्थापित केलं असल्याचे ज्ञानोबाराय आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगतात आणि या चरण पादुका आपण स्वतःच्या आचरणासाठी घेऊन जात असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com