पालिकेच्या करसंवाद उपक्रमात
नागरिकांच्या शंकांचे निरसन

पालिकेच्या करसंवाद उपक्रमात नागरिकांच्या शंकांचे निरसन

पिंपरी, ता. १८ ः उपयोगकर्ता शुल्क कशासाठी? अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधीपासून? असे प्रश्न नागरिकांनी महापालिकेच्या करसंवाद कार्यक्रमात विचारले. त्यांच्या शंकाचे निरसन प्रशासनाने केले व सूचनांची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न सोडविण्याचा आदेश दिला.
करदात्यांच्या मालमत्ता कराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी महापालिकेतर्फे आयोजित ‘करसंवाद’ उपक्रमात ४० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांच्या जूनअखेरच्या सवलतींची माहिती देण्यात आली. ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ स्वरूपात नागरिक सहभागी झाले होते. आगाऊ व ‘ऑनलाइन’ भरणा केल्यास आणि एसटीपी व ऑनसाईट कम्पोस्टिंग यंत्रणा असल्यास सामान्य करात पाच टक्के; महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांना ३० टक्के, दिव्यांगांना ५० टक्के, माजी सैनिकांना १०० टक्के, झिरो वेस्ट व एसटीपी प्लांटसाठी १० टक्के सवलत दिली जाणार असून नागरिकांनी जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा करण्याचे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.
‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नागरिकांची पिळवणूक नसून, सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना कचरा संकलन व विलगीकरण यासाठी मिळणाऱ्या सेवेसाठीचे शुल्क आहे, असे सांगून देशमुख यांनी संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. जूनअखेर कराचा भरणा न केल्यास जप्ती करण्याचे आणि थकबाकीदारांना प्रतिमाह दोन टक्के विलंब शुल्क आकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com