आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये
मोठी संधी ः डॉ. साठे

आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये मोठी संधी ः डॉ. साठे

Published on

पिंपरी, ता. १८ ः इतर देशांच्या तुलनेत भारतात बांधकामामध्ये काचेचा वापर कमी केला जातो, असं मानले जाते. मात्र, तो न करण्यामागे येथील हवामान हे कारण आहे. या आणि अशा अनेक गोष्टींवर संशोधन आज आर्किटेक्ट क्षेत्रात होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, असे मत आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्ट ॲंड डिझाईनचे प्राध्यापक डॉ. हेमंत साठे यांनी रविवारी व्यक्त केले. ‘आर्किटेक्चर क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते.
भारतात वाढत्या बांधकाम उद्योगामुळे कुशल आर्किटेक्टचीही मागणीही झपाट्याने वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन, आज ४५० हून अधिक महाविद्यालयांमध्ये आर्किटेक्टची पदवी दिली जाते. तर या क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची संख्या शंभराहून जास्त आहे. कौन्सिल ऑफ आर्किटेक्टने घालून दिलेल्या नियमांनुसारच या सर्व कॉलेजचे प्रवेश पार पडतात, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात प्रत्येक वर्षी काय शिकवलं जातं, याची सखोल माहिती प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यावेळी प्राध्यापिका सोनल निर्मळ यांनी दिली. आर्किटेक्चर हे एक नावीन्यपूर्ण क्षेत्र आहे. केवळ इमारती उभ्या करणं, हे आर्किटेक्टचं काम नसते तर कल्पकतेबरोबरच त्या इमारतीची सुरक्षितता कशी जपली गेली पाहिजे, हे देखील त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.