‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर’
संमेलनात ‘भाजप’कडून मार्गदर्शन

‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर’ संमेलनात ‘भाजप’कडून मार्गदर्शन

Published on

पिंपरी, ता. १८ ः भारताने कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय, विकास कामे व जनहितार्थच्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी याकरिता महाजनसंपर्क अभियान ‘मोदी@९’ देशात सुरू आहे. त्याअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचे ‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर संमेलन’ पिंपळे सौदागर येथे उत्साहात झाले. त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघाचे संयोजक बाळा भेगडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा ढोरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, पिंपरी विधानसभा संयोजक राजेश पिल्ले, मावळ विधानसभा संयोजक सागर शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत नखाते, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे आदी उपस्थित होते. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर पीयूष पाटील, कुणाल मोरे व प्रणय राज गोस्वामी यांनी सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे? याबाबत माहिती दिली. संमेलनाचे मावळ लोकसभेचे संयोजक शत्रुघ्न काटे यांनी प्रस्ताविक केले. ‘मोदी@९’चे जिल्हा सहसंयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. चिंचवड विधानसभा संयोजक अमेय देशपांडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.