पालकांनी मुलांना आपला वेळ द्यावा - आशिष दुबे

पालकांनी मुलांना आपला वेळ द्यावा - आशिष दुबे

पालकांनी आपल्या पाल्यांना
वेळ द्यावा ः आशिष दुबे

पिंपरी, ता. १८ ः पाल्याच्या वयाच्या पाच वर्षांपर्यंत त्यांना तुमचे प्रेम द्या, पंधरा वर्षापर्यंत त्यांना शिस्त लावा. मात्र त्यानंतर त्याचे मित्र बना, असा कानमंत्र ‘एक्सिड ॲकॅडमी’चे संचालक आशिष दुबे यांनी पालकांना दिला. ‘किशोरवयीन मुलांचे पालकत्व’ या परिसंवादामध्ये ते बोलत होते. पालक मुलांना वेळ देत नाहीत म्हणून जनरेशन गॅप वाढत आहे. पालकांनी आपल्या मुलांबरोबरचा संवाद वाढवला तर त्यांना मोबाईलची गरज पडणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले.
़‘रात्र ही राक्षसाची असते व दिवस हा माणसांसाठी असतो. त्यामुळे लवकर जेवणे, लवकर झोपणे या सवयी अंगीकारल्या पाहिजे. आपल्या शरीराचे एक ‘बायोलॉजिकल क्लॉक’ असते ते जर बिघडले तर आरोग्यावर परिणाम होतो. दिवसाची सुरवात आळसाने होते. त्यामुळे एखादा उपवास करतो, त्याचप्रमाणे मोबाईलचा वापरही हळूहळू आपल्या दैनंदिनी जीवनात कमी करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थी व पालकांनी दिला.
पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com