Sat, Jan 28, 2023

एमआयडीसी प्रीमियर लीगचा आजपासून चिखलीत थरार
एमआयडीसी प्रीमियर लीगचा आजपासून चिखलीत थरार
Published on : 23 January 2023, 9:04 am
पिंपरी, ता. २३ : दरवर्षीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी चाकण-भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटना यांनी एमआयडीसी प्रीमियर लीग क्रिकेट जियाताई कप स्पर्धेचे आयोजन अतिशय दिमाखात केले आहे. ही स्पर्धा सिल्वर क्रिकेट ॲकॅडमी पाटील नगर, चिखली येथील स्टेडिअमवर आयोजित केली आहे. २३, २४ व २५ जानेवारी २०२३ स्पर्धा होणार आहे. यावर्षी १२ कंपन्यांच्या टीम्स खेळणार आहेत. सदर स्पर्धा ही युट्युब लाइव्ह वरून देखील दिसणार आहे. एमआयडीसी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे मुख्य समन्वयक निखिल देशमुख, सीए ऋषी खळदकर, प्रवीण शिंदे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केलेले आहे.