Thur, Feb 9, 2023

हनुमान सुरनर यांना पीएचडी प्रदान
हनुमान सुरनर यांना पीएचडी प्रदान
Published on : 23 January 2023, 10:27 am
सोमाटणे, ता. २३ ः शिरगाव येथील देवळे विद्यालयाचे शिक्षक हनुमान सुरनर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली. आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक हनुमान सुरनर यांनी अंत्योदय अन्न योजनेचा आर्थिक व सामाजिक अभ्यास पुणे जिल्हा सन २००५ ते २०१५ या कालावधीतील प्रबंध सादर केला होता. त्यांच्या प्रबंधाची सावित्रीबाई फुले पुणे-विद्यापीठाने दखल घेऊन त्यांना विषयातील पीएचडी जाहीर केली. सिद्धिविनायक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अरविंद शेलार यांनी सुरनर यांना मार्गदर्शन केले होते. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देवळे,सचिव सपना लालचंदानी,प्राचार्य रमेश फरताडे,विजय लोखंडे,विजय लोखंडे आदींनी केले.